सनबर्न फेस्टिव्हल, गोवा...
सनबर्नची सुरुवात 2007 मध्ये झाली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गोव्यातील वागाटोरमध्ये आयोजित होणाऱ्या या तीन दिवसांच्या फेस्टिव्हलमध्ये इलेक्ट्रॉनिक संगीत, मनोरंजक कार्यक्रम, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि शॉपिंगचा अनुभव घेता येतो. हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम बनला आहे, ज्यात जगभरातील हजारो संगीतप्रेमी सहभागी होतात. संगीताच्या विविध प्रकारांसाठी हा फेस्टिव्हल प्रसिद्ध आहे.
advertisement
जैसलमेर डेझर्ट फेस्टिव्हल, राजस्थान..
तुम्हाला राजस्थानच्या पारंपरिक वाळवंटी जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल तर जैसलमेर डेझर्ट फेस्टिव्हल तुमच्यासाठी खास आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात हा फेस्टिव्हल तीन दिवस चालतो. या वेळी तुम्ही उंटांच्या सजावटीपासून ते उंटांच्या पोलो आणि जिम्नॅस्टिक्सपर्यंत अनेक गोष्टी पाहू शकता. यासोबतच संगीताच्या तालावर उंटांचे नृत्य आणि राजस्थानी संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचाही तुम्ही आनंद घेऊ शकता.
मनाली विंटर फेस्टिव्हल, हिमाचल प्रदेश..
हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये जानेवारी महिन्यात हा विंटर फेस्टिव्हल साजरा होतो. 1977 मध्ये सुरू झालेल्या या फेस्टिव्हलमध्ये हिमाचली संस्कृतीचे दर्शन घडते. येथे लोकनृत्य, सांस्कृतिक स्पर्धा आणि स्थानिक पदार्थांची चव घेण्यासाठी गर्दी असते. याव्यतिरिक्त, सोलांग व्हॅलीमध्ये तुम्ही स्कीइंग आणि स्नोबोर्डिंगसारख्या हिवाळी खेळांचाही अनुभव घेऊ शकता.
रण उत्सव, कच्छ, गुजरात...
भारतातील सर्वात उत्साही हिवाळी फेस्टिव्हलपैकी एक, रण उत्सव हा गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील व्हाईट डेझर्टमध्ये साजरा होतो. जगातील सर्वात मोठ्या मीठाच्या वाळवंटापैकी एक असलेले कच्छचे रण हे एक आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे. हा फेस्टिव्हल 28 ऑक्टोबर ते 23 फेब्रुवारीपर्यंत, तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ चालतो. या काळात येथे लोकनृत्य, संगीत कार्यक्रम, हस्तकला, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, उंट सफारी आणि साहसी खेळांची गर्दी असते.
हॉर्नबिल फेस्टिव्हल, कोहिमा, नागालँड...
नागालँडच्या कोहिमामध्ये होणारा हॉर्नबिल फेस्टिव्हल हा भारतातील आदिवासी संस्कृतीचे खरे दर्शन घडवतो. दरवर्षी डिसेंबर महिन्यात नागालँडमधील विविध जमातींचे लोक एकत्र येऊन आपली कला, संगीत, हस्तकला आणि संस्कृती लोकांसमोर सादर करतात. म्हणूनच हा फेस्टिव्हल जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहे.