महात्मा गांधी मिशन विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. सूर्यकांत सपकाळ व डॉ. सुचिता गादेकर यांना 'इनोव्हेटिव्ह कॅटलिस्ट प्रोसेस फॉर असेमेट्रिक सिंथेसिस ऑफ कैरल कंपाऊंड' या विषयावरील संशोधनासाठी भारत सरकारचे पेटंट जाहीर झाले आहे.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. सूर्यकांत सपकाळ आणि डॉ. सुचिता गादेकर यांना 'इनोव्हेटिव्ह कॅटलिस्ट प्रोसेस फॉर असेमेट्रिक सिंथेसिस ऑफ कैरल कंपाऊंड' या विषयावर केलेल्या संशोधनासाठी भारत सरकारकडून पेटंट जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे हे दोघे पती-पत्नी असून, त्यांच्या एकत्रित मेहनतीमुळे हे यश प्राप्त झाले आहे.
advertisement
या संशोधनामुळे अँटीबायोटिक आणि अँटी-कॅन्सर औषधांमध्ये क्रांतिकारक बदल होण्याची शक्यता आहे. संशोधन प्रक्रियेत अनेक अडचणींचा सामना करावा लागला, कारण विद्यापीठात अत्याधुनिक संशोधनासाठी लागणारी साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे हे संशोधन बाहेरच्या प्रयोगशाळांमध्ये पूर्ण करावे लागले.
संशोधनाचे फायदे:
बायो ऍक्टिव्ह हेटरोसायकलिक कंपाऊंड तयार करण्यासाठी मदत.
एनान्सिओ सिलेक्टिव्हिटी वाढवून अणुकणांची कार्यक्षमता सुधारली जाईल.
पर्यावरणीय प्रभाव कमी करत उत्पादन प्रक्रिया अधिक प्रभावी होईल.
औषधांची किंमत कमी होण्यास आणि उत्पादन प्रक्रियेत स्केलेबिलिटी सुनिश्चित करण्यास मदत.
पृथक्करण पद्धतींमध्ये सुधारणा होऊन प्रभावी परिणाम मिळण्यास मदत.
हे पेटंट पुढील वीस वर्षांसाठी त्यांच्या नावावर राहणार आहे, ज्यामुळे देशाच्या औषधनिर्मिती क्षेत्राला नवी दिशा मिळेल.





