अनिल यार्दी आणि आसावरी कुलकर्णी असे या जोडप्याचे नाव आहे. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील याची पर्वा न करता 'अपने दिल की सुनो', असं म्हणत आपल्या उतारवयातील एकटेपणा दूर करण्यासाठी त्यांनी आधार शोधला. त्यांची पहिली भेट कशी झाली? दोघांच्या आवडीनिवडी कशा जुळून आल्या आणि त्यांनी लिव्ह इन मध्ये राहण्याचं कसं ठरवलं हे पाहूया
advertisement
रक्षाबंधनासाठी पुण्यातील सर्वात स्वस्त बाजार; पैठणीच्या कधीही न पाहिलेल्या वस्तू पाहून बहीण खूश
अनिल यार्दी आणि आसावरी कुलकर्णी हे दोघंही सध्या 72 वर्षांचे आहेत. पुण्यातल्या एका संस्थेतर्फे त्यांची भेट झाली. या संस्थेनं एक ट्रिप आयोजिक केली होती, त्यामध्ये आमची ओळख झाली. आमचे सूर जुळले आणि भेटीगाठीही वाढू लागल्या, अशी माहिती यार्दी यांनी दिली.
कशी झाली सुरूवात?
अनिल यार्दी यांच्या पत्नीचं 2013 साली निधन झालं. त्यानंतर ते दोन वर्ष एकटे होते. मुलीचं लग्न होतं. त्यावेळी काही जणांनी दुसरं लग्न कर असा सल्ला दिला. पण, मला अशा बंधनात अडकायचं नव्हतं. त्यावेळी मित्रांकडूनच 'लिव्ह इन' बद्दल माहिती मिळाली, असं यार्दी यांनी सांगितलं.
आसावरी कुलकर्णी त्यांचे पती गेल्यानंतर 16 ते 17 वर्ष कुटुंबासोबत राहत होत्या. एका वेळेनंतर त्यांनाही एकटेपणा जाणवू लागला. नोकरीतून रिटायर झाल्यानं काही कामही उरलं नव्हतं. त्यावेळीच त्यांना लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल माहिती मिळाली.
वयाच्या 96 पर्यंत कधीही आजारी पडले नाहीत; काय आहे आजोबांच्या हेल्थचा सिक्रेट फंडा?
घरच्यांनी कसं स्विकारलं?
अनिल यार्दी यांच्या मुलीचा सुरुवातीला या सर्वाला नकार होता. त्यावेळी या दोघांनी हार न मानता मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यांना नेमकं काय वाटतं? याची जाणीव मुलीला करुन दिली. त्याला वेळ लागल पण हार न मानता त्यांनी मुलीला आणि घरच्यांना समाजावलं, असं त्यांनी सांगितलं.
एकदा तुम्ही तुमच्या मनाशी पक्के केले, तर त्याला समाज काय म्हणेल? तुमचे शेजारचे काय म्हणतील? किंवा तुमचे नातेवाईक काय म्हणतील? याकडे तुम्ही लक्ष न देता तुम्ही तुमच्या हिमतीवरती गोष्टी पुढे नेल्या पाहिजे असेही ते म्हणाले.
जे लोकं एकटे आहेत, ज्यांचं कोणी घरात वाट बघणार नाही. अशा लोकांनी लिव्ह इन रिलेशनशिपचा नक्कीच विचार केला पाहिजे,' असं मत आसावरी कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केलं.