TRENDING:

Hair Loss : केस का गळतात ? केस वाढवण्यासाठी काय करायचं ? कोणती चाचणी आवश्यक ?

Last Updated:

जीवनसत्त्वांव्यतिरिक्त, लोहाची कमतरता, थायरॉईड आणि हार्मोनल असंतुलन ही देखील केस गळती आणि केसांची वाढ खुंटण्याची प्रमुख कारणं आहेत. कमी लोह पातळीमुळे केस गळती वाढू शकते, कारण केसांच्या कुपांमधे ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

सध्या बरेच लोकांची तक्रार आहे की, केसांची वाढ थांबली आहे. विविध उत्पादनं वापरून आणि योग्य काळजी घेऊनही त्यांचे केस वाढत नाहीत. तुम्हालाही ही समस्या जाणवत असेल तर ही माहिती पूर्ण वाचा.

केसांची वाढ न होणं हे केवळ बाह्य कारणांमुळेच नाही तर शरीरातील पोषणाच्या कमतरतेचंही लक्षण असू शकतं. लिमा महाजन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. केसांची वाढ थांबली असेल आणि अजिबात वाढत नसतील, तर ते दोन विशिष्ट जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे असू शकते. व्हिटॅमिन डी3 आणि व्हिटॅमिन बी12 ची कमतरता थेट केसांच्या वाढीवर परिणाम करते.

advertisement

Arthritis : बराच एका जागी बसणं टाळा, हाडं आणि सांध्यांसाठी आहे धोकादायक, अशी घ्या काळजी

व्हिटॅमिन डी 3 - पोषणतज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन डी3 च्या कमतरतेमुळे केसांची वाढ थांबते आणि केस गळती वाढते. व्हिटॅमिन डी3 मुळे केसांची मुळं मजबूत होतातच आणि टाळूवर नवीन केसांची वाढ होण्यास मदत होते.

व्हिटॅमिन बी 12 - व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेमुळे केसांची वाढ देखील थांबू शकते. कारण व्हिटॅमिन बी 12 शरीराला ऑक्सिजन आणि पोषक घटक योग्यरित्या टाळूपर्यंत पोहोचवण्यास मदत करतं. त्याच्या कमतरतेमुळे, टाळूला पुरेसं पोषण मिळत नाही, ज्यामुळे केसांची वाढ थांबते आणि ते कमकुवत, पातळ आणि कोरडे देखील होतात.

advertisement

जीवनसत्त्वांव्यतिरिक्त, लोहाची कमतरता, थायरॉईड आणि हार्मोनल असंतुलन ही देखील केस गळती आणि केसांची वाढ खुंटण्याची प्रमुख कारणं आहेत. कमी लोह पातळीमुळे केस गळती वाढू शकते, कारण केसांच्या कुपांमधे ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो.

Vitamin B12 : व्हिटॅमिन बी 12 शरीरासाठी का आवश्यक ? शाकाहारींनी यासाठी कोणते पदार्थ खावेत ?

लिमा महाजन यांच्या मते, केसांची वाढ थांबली असेल आणि केस गळत असतील, तर नेमके कारण जाणून घेण्यासाठी पाच रक्त चाचण्या करू शकता.

advertisement

व्हिटॅमिन डी 3

व्हिटॅमिन बी 12

लोह किंवा फेरिटिन

थायरॉईड प्रोफाइल (TSH, T3, T4), हार्मोनल पॅनेल विशेषतः DHT लेव्हल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

या चाचण्यांमुळे केस गळण्याचं मूळ कारण ओळखण्यास मदत होते. या चाचण्यांच्या नुसार योग्य आहार घेतला की तुमचे केस आतून मजबूत होऊ शकतील.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Loss : केस का गळतात ? केस वाढवण्यासाठी काय करायचं ? कोणती चाचणी आवश्यक ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल