गोपाळकाला बनवण्यासाठी साहित्य
गोपाळकाला बनवण्यासाठी पोहे, लाह्या, डाळिंब, सफरचंद (तुम्ही कुठलंही फळ वापरू शकता.) ओल्या खोबऱ्याचे काप, दही, हरभरा डाळ(तुम्ही डाळी ऐवजी डाळं देखील घेऊ शकता.) काकडी, लोणचं (तुम्ही तुमच्या आवडीनुसार लिंबाचं किंवा कैरीचं लोणचं घेऊ शकता.) शेंगदाणे, साखर, मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि तुळशीची पाने हे साहित्य लागेल.
Dahihandi 2025: यंदा 46 ठिकाणी रंगणार गोविंदांचा थरार, 1600 पोलीस कर्मचारी तैनात
advertisement
गोपाळकाला बनवण्याची कृती
सर्वप्रथम पोहे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे. त्यानंतर एका भांड्यामध्ये ते पोहे लाह्या, डाळींबाचे दाणे, सफरचंदाच्या फोडी, ओल्या खोबऱ्याच्या फोडी आणि दही टाकायचं. पण ते दही जास्त आंबट नसावं, थोडंसं गोडसर दही टाकावं. त्यानंतर हरभरा डाळ टाकायची. पण ही डाळ अगोदर एक ते दोन तास भिजू घालत ठेवायची आणि त्यानंतरच टाकायची. काकडीच्या बारीक फोडी देखील त्यात घालायच्या आहेत.
लोणचं तुम्ही मिक्सरमधून बारीक करून देखील घेऊ शकता. लोणच्याची पेस्ट तुम्ही यामध्ये टाकू शकता. त्यानंतर शेंगदाणे टाकायचे. तुम्ही शेंगदाणे भाजून घेतले तरी चालेल. चवीनुसार साखर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर आणि तुळशीचे पाने देखील टाकायची. हे सर्व साहित्य एकत्र टाकून व्यवस्थित रित्या एकजीव करून घ्यायचं.
तयार मिश्रणात वरून गार्निशिंगला डाळिंबाचे दाणे, थोडीशी कोथिंबीर आणि श्रीकृष्ण यांना आवडणारी तुळशीची पाने टाकायची. अशाप्रकारे झटपट गोपाळकाला बनवून तयार होतो. तर या गोकुळाष्टमीला तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धीनं गोपाळकाला बनवू शकता.