TRENDING:

गणेश चतुर्थीसाठी फक्त 10 मिनिटात बनवा पनीर मलई मोदक, पाहा सोपी रेसिपी

Last Updated:

गणेश चतुर्थीला अवघ्या दहा मिनिटात पनीर मलई मोदक कसे करावे? ते पाहूया

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोंबिवली, 18 सप्टेंबर :  गणेश चतुर्थीला केवळ एक दिवस बाकी आहे. बाप्पाचे आगमन लवकरच घराघरात होईल. बाप्पाला प्रसाद काय दाखवावा अशी चर्चा साऱ्याच घरात सुरू असेल. फळ, पेढे साखर किंवा काजू बदाम यापेक्षा काहीतरी वेगळा आणि हटके प्रसाद बाप्पाला दाखावावा असे प्रत्येकालाच वाटते. डोंबिवलीत राहणाऱ्या मधुरा सावंत यांनी दहा मिनिटात घरच्या घरी पनीर मोदक कसे तयार करावे यासंदर्भात माहिती दिली आहे.
advertisement

साहित्य

तूप, पनीर, मिल्क पावडर, पिठीसाखर, काजू बदाम पावडर, सजावटीसाठी पिस्त्याचे तुकडे हे जिन्नस वापरून हा मोदक तयार केला जातो.

गणेश चतुर्थीसाठी घरी कधी आणावा बाप्पा? काय आहे शूभ मुहूर्त? संकट टाळण्यासाठी पाहा सर्व माहिती

कृती

सुरुवातीला पनीरचे तुकडे घ्यावे. ते मिक्सर मध्ये रवाळ पद्धतीने बारीक करून घ्यावे. त्यांनतर एक पॅन घ्यावा. या पॅनमध्ये तूप टाकावे. या तुपावर बारीक केलेले पनीर टाकावे. ते मध्यम मंद आचेच्या गॅसवर चांगले पाच मिनिट परतून घ्यावे. त्यात एक वाटी पनीर घेतले असेल तर पाऊण वाटी मिल्क पावडर , दोन ते तीन चमचे पिठीसाखर , काजू बदाम पूड टाकून पुन्हा परतून घ्यावे. त्या मिश्रणाचा गोळा झाला आणि पाणी सर्व निघून गेले की मिश्रण एका प्लेटमध्ये टाकून गार करावे आणि मोदक साच्याला थोड तूप लावून ते काढावे. त्यानंतर पिस्त्याचे तुकडे आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवावे की हे मोदक तयार होतात, अशी माहिती मधुरा यांनी दिली.

advertisement

ऋषीपंचमीला असते ‘या’ भाजीचे महत्त्व, पाहा तयार करण्याची योग्य पद्धत

पनीरचे मलई मोदक अगदी कलाकंदाच्या चवीचे लागतात. मऊ असलेले दोन मोदक खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटते. चवीला छान असलेले हे मोदक बाप्पासह लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडतील यात काही शंका नाही, असं मधुरा यांनी सांगितलं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
गणेश चतुर्थीसाठी फक्त 10 मिनिटात बनवा पनीर मलई मोदक, पाहा सोपी रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल