गाजराचे लोणचे साहित्य
1 मोठा गाजर, शेंगदाण्याचे तेल, हिंग, हळद, लाल तिखट, जिरे, मोहरी, मीठ आणि लिंबू एवढेच साहित्य यासाठी लागेल.
अस्सल कोकणी मेवा, फक्त 50 रुपयांपासून चाखा चव, मुंबईत इथं आहे प्रसिद्ध स्टॉल
गाजराचे लोणचे कृती
सुरुवातीला गाजर स्वच्छ धुऊन त्याची साल काढून घ्यावी आणि बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवावी त्यात शेंगदाण्याचे तेल घालून घ्यायचे. तेल गरम झाल्यानंतर फोडणी द्यायची, त्यात मोहरी, जिरे आणि हिंग टाकून घ्यायचा. गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचे आणि त्याला थंड होऊ द्यायचे. हे थंड झाल्यानंतर यामध्ये हळद आणि तिखट टाकून घ्यायचे आणि ही तयार केलेली फोडणी गाजराच्या फोडीवर टाकून त्यावरती थोडेसे लिंबू एकत्र करून घ्यायचे. यामध्ये तुम्ही बाजारात भेटणारा लोणच्याचा मसाला देखील घालू शकता. ते ऑप्शनल आहे. अशा पद्धतीने हे बनवून तयार होते, तर तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा.
advertisement





