मुंबई : थंडीच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त उष्ण पदार्थांचे सेवन केले जाते. थंडीच्या दिवसांमध्ये तीळ हे शरीरासाठी फायदेशीर ठरते. तीळ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये त्याचे जास्त सेवन केले जाते. तसेच सणानिमित्त तिळाचे पदार्थ केले जातात. थंडीच्या दिवसात येणारा पहिलाच सण हा मकर संक्रांत असतो. संक्रांतिनिमित्त सर्वत्र तिळाच्या पदार्थांचे सेवन जास्त केले जाते. तिळाचे लाडू, तिळाची चिक्की, तिळाची भाकरी असे वेगवेगळे तिळाचे पदार्थ आपण सर्वत्रच पाहतो. पण काळानुसार पारंपारिक पद्धतीने महाराष्ट्रात भोगीला तिळाची भाकरी केली जाते. तिळाची भाकरी कशी करावी? याची रेसिपी आपल्याला सायली तोडणकर यांनी सांगितली आहे.
advertisement
तिळाची भाकरी बनवण्यासाठी साहित्य
पांढऱ्या रंगाचे तीळ, चिमूटभर मीठ, पाणी, ज्वारी-नाचणी- बाजरीचे मिक्स पीठ आणि तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही गव्हाचे पीठ देखील घेऊ शकता.
शाहीहार ते चिंचपेटी, मकर संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने, 70 रुपयांपासून करा खरेदी
तिळाची भाकरी बनवण्याची पद्धत
पांढरे तीळ आपण थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम पिठात मीठ योग्य पद्धतीने मिश्रित करून घ्यायचे आहे. त्यानंतर वरून थोडेसे भाजलेले तीळ टाकून घ्यायचे आहेत. तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही गव्हाचे पीठ टाकू शकता. त्याच्यानंतर प्रमाणानुसार पाणी घालायचं आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही गरम किंवा कोमट पाणी देखील घेऊ शकता. पाण्याने भाकरीचे पीठ मळून घ्या.
भाकरीचे पीठ मळून झाल्यानंतर आपण व्यवस्थित असे त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत. गोळे करून झाल्यानंतर भाकरी तुम्हाला हव्या त्या आकाराची थापून घ्यायची आहे. भाकरी संपूर्ण थापून झाल्यानंतर त्याच्यावर पुन्हा एकदा वरून तीळ टाकायचे आहेत. तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावर भाकरी टाकायची आहे. तवा व्यवस्थित गरम झाल्यामुळे आपण इथे तव्यावर पाण्याचा वापर करत नाही आहोत. गरम गरम तव्यावर दोन्ही बाजूने भाकरी व्यवस्थितपणे भाजून घ्यायची आहे. भाकरी योग्य पद्धतीने दोन्ही बाजूने भाजली आहे, याची खात्री झाल्यानंतर तुमची भाकरी खाण्यासाठी एकदम तयार आहे.
मकर संक्रांत सणानिमित्त किंवा इतर वर्षभर देखील तुम्ही मल्टीग्रेन पिठाची भाकरी अगदी झटपट पद्धतीने बनवू शकता. तुम्ही जर वर्किंग वुमन आहात आणि तुम्हाला पौष्टिक असे पदार्थ खायची आवड आहे, तरी ही भाकरी तुमच्या आहारात नक्कीच समाविष्ट करा.