शाहीहार ते चिंचपेटी, मकर संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने, 70 रुपयांपासून करा खरेदी

Last Updated:

नवीन वर्ष सुरु झालं की पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी हलव्याचे सुंदर दागिने घालण्याची पद्धत आहे.

+
News18

News18

निरंजन कामत, प्रतिनिधी 
कोल्हापूर : नवीन वर्ष सुरु झालं की पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. तिळाचे लाडू आणि तिळगुळ वाटून ‘तिळगूळ घ्या गोड- गोड बोला’ असे सांगत वर्षाची सुरुवात आपण गोड करत असतो. तिळाच्या लाडूसोबतच या सणाची खासियत म्हणजे ‘हलव्याचे दागिने’. या दिवशी हलव्याचे सुंदर दागिने घालण्याची पद्धत आहे. दागिने घालण्याची ही पद्धत पारंपरिक आहे. कोल्हापुरातील बाजारपेठेत या दागिन्यांच्या भरपूर व्हरायटी उपलब्ध आहेत. महालक्ष्मी देवीच्या परिसरात महाद्वार रोड वर हे दागिने तुम्हाला खरेदी करता येतील.
advertisement
गेल्या 50 वर्षांपासून कोल्हापूरच्या सुगंधी परिवाराने हे हलव्याचे दागिने बनवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यांच्या परिवाराची तिसरी पिढी आज हलव्याचे दागिने मोठ्या उत्साहात बनवत आहेत. सुगंधी परिवाराच्या अलका सुगंधी यांना खरंतर लहानपणापासून वेगवेगळ्या गोष्टी स्वतः बनवण्याची आवड होती. आज त्यांच्याच माध्यमातून त्यांच्या आवडीचं रूपांतर एका मोठ्या व्यवसायात झालं आहे. त्यांनी बनवलेल्या हलव्याच्या दागिन्यांची मागणी ही देश विदेशात असल्याची पाहायला मिळते. खरंतर सध्या बाजारामध्ये हलव्याचे दागिने वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये उपलब्ध आहेत. पण बहुतांशी फेविकॉलचा वापर करून हे दागिने बनवले जातात मात्र सुगंधी परिवार आजही पारंपरिक पद्धतीने फुलाप्रमाणे तिळगुळ ओऊन दागिने बनवतात.
advertisement
सुगंधी परिवाराने हे हलव्याचे दागिने अगदी 70 रुपयांपासून उपलब्ध करून दिले आहेत. या दागिनांचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात आहे. खरंतर लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीला जोडप्याला हलव्याचे दागिने घेतले जातात. काळ्या कपड्यावर हलव्याचे दागिने हे अधिक खुलून दिसतात. या हलव्याच्या दागिन्यांमध्ये आपल्याला पारंपरिक दागिने जास्त पाहायला मिळतील, अशी माहिती गायत्री सुगंधी यांनी दिली. यात ठुशी, शाहीहार, मोहनमाळ, बोरहार, चिंचपेटी, असे बरेच दागिने त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पुरुषांसाठीही मुकुट, फुलांचा गुच्छ, असे दागिने त्यांच्याकडे आहेत. हे दागिने 70 रुपयांपासून उपलब्ध आहेत, अशी माहिती गायत्री सुगंधी यांनी दिली.
advertisement
त्यांनी बनवलेल्या हलव्याचे दागिने हे दरवर्षी अखंड देशभरातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं सांगतात. इतकेच नाही तर त्यांच्या दागिन्यांची दरवर्षीची पहिली ऑर्डर ही परदेशातच जाते अशी माहिती मयुरी उरसाल यांनी दिली.
हलव्याचे दागिने हे हातानेच पारंपारिक पद्धतीने बनवावे लागतात. कोल्हापुरात पहिल्यांदाच हे हलव्याचे दागिने बनवण्याची सुरुवात सुगंधी परिवारानेच केली. आजही हे हलव्याचे दागिने सुगंधी परिवाराकडून पारंपरिक पद्धतीने बनवले जातात. तसेच अशाच पद्धतीने यापुढेही नवनवीन दागिने बनवत राहण्याचा त्यांचा मानस आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
शाहीहार ते चिंचपेटी, मकर संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने, 70 रुपयांपासून करा खरेदी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement