देशात जसं शारीरिक व्याधींचं प्रमाण वाढतंय तसंच मानसिक आरोग्य झपाट्यानं बिघडत चाललंय. विशेषतः तरुणांमधे हे प्रमाण वाढतंय. इंडियन सायकियाट्रिक सोसायटीच्या आकडेवारीनुसार, 60 टक्के मानसिक विकार 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमधे आढळतात.
तरुणांवरील वाढता दबाव, स्पर्धा, बेरोजगारी, सामाजिक अपेक्षा आणि नैराश्य, चिंता आणि इतर विकारांना कारणीभूत ठरणारे इतर घटक यामुळे हे प्रमाण वाढतंय. 18 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या 7.3 टक्के भारतीय तरुणांना मानसिक आरोग्य समस्या आहेत. पण, त्यासाठी उपचार घेणाऱ्यांची संख्या अगदीच कमी म्हणजे एक टक्का आहे.
advertisement
ही आकडेवारी म्हणजे देशासमोरचं किती मोठं संकट आहे याचं भान कमीजणांना आहे. कारण मानसिक आरोग्याचा त्रास ना रस्त्यावर दिसतो ना याची रुग्णालयांत नोंद होते. म्हणूनच मानसिक आरोग्य समस्या देशासाठी एक मोठं सार्वजनिक आरोग्य आव्हान बनत चाललंय.
Pre Workout Nutrition : जिममधे जाण्याआधी काय खावं ? किती वेळ आधी खावं ?
यासाठी वेळीच ठोस पावलं उचलली गेली नाहीत तर हे अदृश्य संकट देशाच्या सामाजिक आणि आर्थिक आरोग्यावर परिणाम करू शकते, असा स्पष्ट इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. बंगळुरू येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि न्यूरो सायन्सेस संस्था (NIMHANS) चे राष्ट्रीय मानसिक आरोग्य धोरण आरोग्य मंत्रालय आणि संसदेत सादर करण्यात आलं.
देशातील मोठी लोकसंख्या मानसिक ताण, नैराश्य आणि चिंता विकारांनी ग्रस्त आहे, पण उपचार घेणाऱ्यांची मानसिकता अत्यंत मर्यादित आहे. युनिसेफच्या 2024-2025 मधे प्रकाशित झालेल्या 18 ते 29 वर्ष वयोगटासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आणि विविध वैद्यकीय जर्नल्समध्ये हा इशारा देण्यात आला आहे.
13 ते 17 वयोगटातील अंदाजे 7.3 टक्के किशोरवयीन मुलं कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या मानसिक विकारानं ग्रस्त आहेत. स्पर्धा, परीक्षेचा दबाव, सामाजिक अपेक्षा आणि डिजिटल जीवनशैली ही मुख्य कारणे आहेत असं NIMHANS ने केलेल्या सर्वेक्षण विश्लेषणातून दिसून आलं आहे.
राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण (NMHS) नुसार, बहुतेक जण उपचारांपर्यंत पोहचू शकत नाहीत किंवा तशी सुविधाही त्यांना मिळत नाही. म्हणूनच उपचारांमधील तफावत म्हणजेच ट्रिटमेंट गॅप 60 टक्क्यांहून अधिक आहे, तर सामान्य मानसिक विकारांमधे म्हणजे नैराश्य आणि चिंता याचं प्रमाण 80 ते 85 टक्के आहे.
लॅन्सेट सायकियाट्री जर्नलमधे प्रकाशित झालेल्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज अभ्यासानुसार, 2017 मधे भारतातील 197.3 दशलक्ष लोक म्हणजे एकूण लोकसंख्येच्या सुमारे 14.3 टक्के नागरिक मानसिक विकारानं ग्रस्त होते. त्यापैकी 45.7 दशलक्ष लोक नैराश्याचे आणि 44.9 दशलक्ष लोक चिंता विकारांनी त्रासले होते.
दिल्ली आणि इतर शहरांमधील परिस्थिती अधिक गंभीर आहे. दिल्लीतील 25.92 टक्के शालेय वयाच्या किशोरवयीन मुलांना नैराश्यानं ग्रासल्याचं अभ्यासात आढळून आलं. 13.70 टक्के मुलांना चिंता असल्याचं आढळून आलं.
Brain Stroke : ब्रेन स्ट्रोक कशामुळे होतो ? जाणून घ्या लक्षणं आणि कारणं
यावर त्वरित उपाय केला नाही तर याचा आर्थिक, सामाजिक आणि राष्ट्रीय विकासावर परिणाम होईल. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकार आणि समाजानं एकत्रितपणे काम केलं पाहिजे जेणेकरून तरुण पिढीला निरोगी आणि सकारात्मक जीवन जगण्याची संधी मिळेल.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जोधपूर आणि ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीनं जानेवारी 2024 मधे इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेंटल हेल्थ सिस्टीम्समध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, देशात मानसिक आजाराचे स्वतःहून अहवाल देण्याचा दर एक टक्क्यापेक्षा कमी आहे. बहुतेक जण त्यांच्या मानसिक समस्येला आजार मानत नाहीत, ज्यामुळे समस्येवर उपचार मिळत नाहीत हे गंभीर वास्तव आहे.
