Brain Stroke : ब्रेन स्ट्रोकचा धोका ओळखा, जाणून घ्या कोणत्या सवयी ठरु शकतात धोकादायक
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यानं आणि त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता यामुळे ब्रेन स्ट्रोक होतो. प्रौढांमधे शारीरिक अपंगत्वाचे हे एक प्रमुख कारण मानलं जातं. ब्रेन हॅमरेज किंवा मेंदूत रक्तस्त्राव होणं असे याचे प्रकार असतात. ते टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे धोके ओळखून त्याप्रमाणे काळजी घेणं. ब्रेन स्ट्रोक टाळण्यासाठी कोणते धोके टाळले पाहिजेत ते पाहूया.
मुंबई : ब्रेन स्ट्रोक होतो तेव्हा शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात. ब्रेन स्ट्रोक होण्याला अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यामुळे ब्रेन स्ट्रोक होऊ नये यासाठी काय करता येईल आणि जीवनशैलीतील बदल यामुळे हा धोका कमी होऊ शकतो.
मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यानं आणि त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता यामुळे ब्रेन स्ट्रोक होतो. प्रौढांमधे शारीरिक अपंगत्वाचं हे एक प्रमुख कारण मानलं जातं. ब्रेन हॅमरेज किंवा मेंदूत रक्तस्त्राव होणं असे याचे प्रकार असतात. ते टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे धोके ओळखून त्याप्रमाणे काळजी घेणं. ब्रेन स्ट्रोक टाळण्यासाठी कोणते धोके टाळले पाहिजेत ते पाहूया.
advertisement
ब्रेन स्ट्रोकची लक्षणं - चेहरा, हात किंवा पाय अचानक सुन्न होणं. बोलण्यात अडचण जाणवणं किंवा अस्पष्ट बोलणं. दृष्टी धूसर होणं किंवा तोल जाणं. कोणत्याही कारणाशिवाय डोकं खूप दुखणं.
काही लक्षणांमुळे ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो, यापासून सावध राहा-
advertisement
उच्च रक्तदाब: ब्रेन स्ट्रोक होण्याचं हे प्रमुख कारण आहे. वृद्धांमधे उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोकचा धोका चार पटीनं वाढू शकतो. तो योग्य मर्यादेत आणण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
धूम्रपान: यामुळे मेंदूतील ब्लॉकेजचा धोका दुपटीनं वाढतो आणि रक्तस्त्राव होण्याचा धोका चौपट होतो. यामुळे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या मानेच्या मुख्य धमन्या असलेल्या कॅरोटिड धमन्यांमधे कोलेस्टेरॉल साचतं.
advertisement
यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.
हृदयरोग: कोरोनरी आर्टरी डिसीज, हृदयाच्या झडपांमधे अडथळा, हृदयाचे ठोके अनियमित होणं आणि हृदयाच्या चेंबरमधे वाढ यामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. ही गाठ फुटते तेव्हा ती रक्तवाहिन्या ब्लॉक करू शकते किंवा मेंदूपर्यंत पोहोचू शकते. म्हणून, हृदयाचं आरोग्य राखणं आणि डॉक्टरांकडून नियमित तपासणी करुन घेणं महत्वाचं आहे.
advertisement
आधी स्ट्रोक आला असेल: एखाद्याला आधी स्ट्रोक आला असेल तर ज्यांना कधीही स्ट्रोक आला नाही त्यांच्या तुलनेत धोका वाढतो. शरीराच्या ग्लुकोज वापरण्याच्या क्षमतेवर याचा परिणाम होतोच तसंच संपूर्ण शरीरातील रक्तवाहिन्यांमधे मोठे बदल घडू शकतात. स्ट्रोकच्या वेळी रक्तातील ग्लुकोजची पातळी जास्त असेल तर मेंदूला नुकसान होण्याचा धोका जास्त असतो.
कोलेस्ट्रॉल असंतुलन: कमी घनतेचं लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल, किंवा एलडीएल, रक्तप्रवाहातून प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवलं जातं. जास्त प्रमाणातली एलडीएल पातळीमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येणं आणि स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते.
advertisement
सक्रिय नसणे: शारीरिकदृष्ट्या सक्रिय नाहीत किंवा लठ्ठ आहेत त्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका तिप्पट असतो.
कौटुंबिक इतिहास म्हणजेच घरातील कोणाला याआधी हा त्रास झाला असेल तर स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. काळजी घ्या, तब्येतीला जपा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 6:04 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Brain Stroke : ब्रेन स्ट्रोकचा धोका ओळखा, जाणून घ्या कोणत्या सवयी ठरु शकतात धोकादायक










