advertisement

Ajit Pawar : ​आता बास झालं! जाता जाता अजितदादांनी जवळच्या व्यक्तीकडे मन मोकळं केलं,असं का म्हणाले?

Last Updated:

अजित पवार यांच्या या अपघाती निधनापूर्वी त्यांनी आपल्या एका जवळच्या शिलेदाराची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान अजित पवार यांनी या शिलेदाराकडे आपलं मनमोकळं केलं होतं.

ajit pawar last conversation with kiran gujar
ajit pawar last conversation with kiran gujar
Ajit Pawar News : राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी अख्खं बारामती आणि मोठा जनसागर लोटला होता. दरम्यान अजित पवार अशाप्रकारे अकाली 'एक्झिट' घेतील असे कुणालाच वाटले नव्हते. पण असे घडले आहे आणि यावर कुणालाच विश्वास बसत नाही आहे. अजित पवार यांच्या या अपघाती निधनापूर्वी त्यांनी आपल्या एका जवळच्या शिलेदाराची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान अजित पवार यांनी या शिलेदाराकडे आपलं मनमोकळं केलं होतं. या दरम्यान दोघांमध्ये काय संवाद झाला होता?हे जाणून घेऊयात.
अजित पवार यांचे हे जवळचे शिलेदार दुसरे तिसरे कुणी नसून, त्यांना तरूण काळापासून अतिशय जवळून पाहणारे किरण गुजर होते. या घटनेच्या पाच दिवस आधीच गुजर यांचं अजितदादांसोबत बोलण झालं होतं. या दरम्यान अजितदादांनी किरण गुजर यांच्यासमोर आपलं मनं मोकळं केलं होतं.विद्या प्रतिष्ठानच विश्वस्त असलेले किरण गुजर सांगतात, अजित पवार बरेच व्यथित होते. पुण्यात इतकी विकासकामं करूनही पक्षाचा महापालिका निवडणुकीत झालेला पराभव अजित पवारांच्या बराच जिव्हारी लागला होता.
advertisement
अजित पवारांच्या या अपघाती मृत्यूवर बोलताना किरण गुजर यांच्यात डोळ्यात पाणी आले होते आणि त्यांचा कंठही दाटून आला होता. दादा अशा प्रकारे जातील,याची कल्पना कोणीच केली नव्हती. विमानात बसताना त्यांनी मला फोन केला आणि विमानात बसल्याचा निरोपही दिला. मी बारामतीच्या विमानतळावर गेलो.त्यावेळी माझ्याच डोळ्यासमोर सगळं काही घडलं. विमानातून दादांना बाहेर काढलं. मी म्हणतोय, हे दादा आहेत, पण तरीही विश्वास बसत नव्हता. काल जे घडलं त्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे, असे किरण गुजर यांनी सांगितले.
advertisement
अजितदादा कंटाळलेले, मनात घालमेल सुरु होती
मला कंटाळा आलाय. आपण बाहेर जाऊया.आम्ही दोघे बाहेर गेलो. अर्धा दिवस बाहेर फिरलो, एका ठिकाणी बसलो, तिथे जेवलो.त्यानंतर दादा म्हणाले, मला नको वाटतंय आता. बास वाटतंय. या सगळ्या गोष्टीचा आता त्रास होतोय मला.त्यांना असं का वाटू लागलं होतं, माहित नाही. तसेच अजित दादांना असं ही वाटायच, मी इतकं काम करतोय. मर मर मरतोय, रात्रंदिवस काम करतोय, तरीही माझ्या वाट्याला गालबोट का लागतंय? यांची त्यांना फार खंत होती,असे किरण गुजर सांगतात.
advertisement
मला थांबावंस वाटतंय असे ते प्रत्येकवेळी म्हणायचे.तेव्हा मी त्यांना म्हणायचो,दादा थांबून चालणार नाही. विधानसभेच्या वेळी त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. त्यांना समजावायला मी मुंबईत गेलो होतो. मी म्हटलं दादांना बारामती पोरकी होईल, दादा,असं कसं चालेल?त्यावर दादा म्हणाले, मी इतकं करून जर लोकसभेला वहिनींच्या बाबतीत असं झालं तर, विधानसभेचं काय? त्यावर मी म्हणालो, दादा तसं होणार नाही. दोन गोष्टी वेगळ्या आहेत, तुम्ही समजू घ्या,असे किरण गुजर यांनी अजित पवार यांना सांगितल्याचे ते सांगतात.तसेच बारामतीच्या बाबतीत माझ्यावर टीका होते. मी कोणाचं वाईट केलंय?असे प्रश्न दादांनी विचारले. त्यामुळे हा विचार करून अजित दादा अलिकडे व्यथित होऊ लागले होते,असे किरण गुजर यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : ​आता बास झालं! जाता जाता अजितदादांनी जवळच्या व्यक्तीकडे मन मोकळं केलं,असं का म्हणाले?
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement