advertisement

Mumbai: मुंबईतील ऑर्थर रोडमध्ये धक्कादायक घटना, कैद्याने केला पोलिसावर जीवघेणा हल्ला

Last Updated:

ऑर्थर रोड जेलमध्ये कुठल्या तरी कारणावरून कैद्यांमध्ये वाद झाला होता. वाद झाल्याचं कळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

News18
News18
संकेत वरक, प्रतिनिधी
मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहामध्ये एका कैद्याने पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्लात पोलीस शिपाई जखमी झाले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे ऑर्थर रोडमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  मुंबईच्या आर्थररोड कारागृहात गुरुवारी ही घटना घडली आहे. कैद्यांमध्ये झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात पोलीस शिपाई वाघ हे जखमी झाले आहे. तर लोकेंद्र उदयसिंग रावत असं हल्लेखोर कैद्याचं नाव आहे.
advertisement
ऑर्थर रोड जेलमध्ये कुठल्या तरी कारणावरून कैद्यांमध्ये वाद झाला होता. वाद झाल्याचं कळतात पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कैद्यांमधला वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होते. हल्लेखोर लोकेंद्र रावतला पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक झालेल्या रावतने पोलीस शिपाई वाघ यांच्यावर हल्ला केला.
मध्यस्तीसाठी आलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की केली. या हल्लात शिपाई वाघ हे जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. तर हल्लेखोर कैद्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे ऑर्थर रोड जेलमधील सुरक्षेबद्दल प्रश्न चिन्ह उपस्थितीत झाले आहे.
advertisement
(सविस्तर बातमी लवकरच)
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: मुंबईतील ऑर्थर रोडमध्ये धक्कादायक घटना, कैद्याने केला पोलिसावर जीवघेणा हल्ला
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement