शनीची उलटी चाल भाग्य उजळणार! 138 दिवस 'या' 3 राशींच्या लोकांची लॉटरी, कशाचीच भासणार नाही कमी
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला 'न्यायदेवता' आणि 'कर्मफळदाता' मानले जाते. शनीची प्रत्येक हालचाल मानवी जीवनावर खोलवर परिणाम करते. सध्या शनी गुरूच्या मीन राशीत विराजमान असून, 27 जुलै 2026 रोजी रात्री 01:25 वाजता शनी याच राशीत 'वक्री' होणार आहे.
Shani Vakri 2026 : ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला 'न्यायदेवता' आणि 'कर्मफळदाता' मानले जाते. शनीची प्रत्येक हालचाल मानवी जीवनावर खोलवर परिणाम करते. सध्या शनी गुरूच्या मीन राशीत विराजमान असून, 27 जुलै 2026 रोजी रात्री 01:25 वाजता शनी याच राशीत 'वक्री' होणार आहे. सुमारे 138 दिवस वक्री अवस्थेत राहिल्यानंतर, शनी 11 डिसेंबर 2026 रोजी पुन्हा मार्गी होईल. शनीची ही वक्री चाल सर्व 12 राशींवर परिणाम करेल, परंतु मेष, कर्क आणि मकर या तीन राशींसाठी हा काळ अत्यंत भाग्योदयाचा आणि आर्थिक प्रगतीचा ठरणार आहे.
शनिदेव 'वक्री' होणे म्हणजे काय?
वैदिक ज्योतिषानुसार, जेव्हा एखादा ग्रह पृथ्वीच्या जवळ येतो, तेव्हा तो मागे जात असल्याचा भास होतो, यालाच 'वक्री' होणे म्हणतात. वक्री अवस्थेत शनी अधिक शक्तिशाली होतो. शनीचा हा वक्री काळ व्यक्तीला आत्मपरीक्षण करायला लावतो. जे लोक प्रामाणिकपणे कष्ट करतात, त्यांना वक्री शनी अनपेक्षित यश आणि रखडलेले पैसे मिळवून देतो.
advertisement
'या' 3 राशींचे नशीब सोन्यासारखे उजळणार
मेष
मेष राशीच्या जातकांसाठी शनी 12 व्या भावात वक्री होणार आहे. सध्या तुमची साडेसाती सुरू असली तरी, शनीची वक्री चाल तुम्हाला दिलासा देणारी ठरेल.
जुन्या कर्जातून तुमची मुक्तता होईल. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आर्थिक नफा मिळेल. जे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले होते, ते आता वेगाने पूर्ण होईल. आध्यात्मिक कामात तुमची प्रगती होईल.
advertisement
कर्क
कर्क राशीच्या कुंडलीत शनी 9 व्या भावात म्हणजेच भाग्य स्थानी वक्री होणार आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्याने तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर प्रसन्न राहतील, ज्यामुळे पदोन्नतीचे योग येतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभाची शक्यता आहे.
मकर
मकर राशीचा स्वामी स्वतः शनी आहे. शनी तुमच्या तिसऱ्या भावात वक्री होत आहे, जे पराक्रम आणि धैर्याचे स्थान आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. लहान भावंडांशी असलेले संबंध सुधारतील. सामाजिक कार्यात तुमची प्रसिद्धी वाढेल आणि तुम्हाला मान-सन्मान मिळेल.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 5:59 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
शनीची उलटी चाल भाग्य उजळणार! 138 दिवस 'या' 3 राशींच्या लोकांची लॉटरी, कशाचीच भासणार नाही कमी










