पूर्वी एप्रिल-मे महिन्यांमध्ये बाजारात आंबा बाजारात उपलब्ध होत असे. आता मात्र, सिझन सुरू होण्यापूर्वीच आंबे बाजारात दाखल होतात. हे आंबे केमिकलचा वापर करून पिकवले जातात आणि त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून, योग्य सिझनमध्ये म्हणजे खूप गरम होऊ लागते तेव्हाच आंबे खरेदी करून खाल्ले पाहिजेत. 'ओन्ली माय हेल्थ'ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
advertisement
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आंबा हे असं फळ आहे ज्यामध्ये जवळजवळ सर्व प्रकारचे पोषक घटक आढळतात. पण, आंबा उष्ण असतो. त्यामुळे आंबा खाल्ल्यानंतर अनेकदा पिंपल्सच्या समस्येचा सामना करावा लागतो. विशेषत: पित्त दोष असलेल्यांना आंबा खाल्ल्यानंतर अपचन किंवा जुलाब यांसारख्या समस्या सुरू होतात. चुकीच्या पद्धतीने आंबा खाल्ल्यामुळे लोकांना अशा समस्यांचा सामना करावा लागतो.
आंबे खाण्यापूर्वी सुमारे दोन तास पाण्यात ठेवले पाहिजेत. दोन तासांनंतर ज्या पाण्यात आंबे ठेवले होते ते पाणी फेकून द्यावं आणि आंबे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवावेत. असं केल्यानं, आंब्यामध्ये असलेले थर्मोजेनिक गुणधर्म कमी होतात. परिणामी आंबे खाल्लानंतर त्रास होणार नाही. आंबा दुधासोबत खाऊ नये, असाही सल्ला डॉक्टर देतात. दूध आणि आंब्यापासून बनवलेलं मँगोशेक अनेकांना आवडतं. पण, मँगोशेकने पचनक्रिया बिघडते आणि पोटात असलेले चांगले बॅक्टेरियासाठीही नष्ट होतात. मँगो शेकऐवजी मर्यादित प्रमाणात आंब्याचा रस प्यायला पाहिजे.
आपल्यापैकी बहुतांशी जणांना फळ खाण्याची योग्य वेळ माहीत नाही. जर तुम्हाला फळांपासून संपूर्ण पोषण हवे असेल तर ती सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यास्त होण्यापूर्वी खाल्ली पाहिजेत. आब्यांलाही हा नियम लागू होतो. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आंबा खाऊ नये. सकाळच्या नाश्त्यात फक्त आंबा खाऊ नये. त्यासोबत पोहे किंवा दलिया खाल्ला पाहिजे. रिकाम्यापोटी आंबा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.