स्पायकरचे जनरल मॅनेजर डिझाइनर अमोल कदम म्हणतात, 'फेस्टिव्ह फॅशन म्हणजे परंपरा आणि आधुनिकता यापैकी एक निवडणे नव्हे, तर त्या दोघांनाही एकत्र जोडणे आहे. डेनिम आराम देतो आणि कुर्ता परंपरा दर्शवतो. ही जोडी तुम्हाला कोणतीही तडजोड न करता स्टायलिशपणे सण साजरा करण्याची संधी देते. त्यामुळे या सिझनमध्ये परंपरेला पुन्हा परिभाषित करा आणि तुमचा आऊटफिटमधून सणांचा उत्साह दिसू द्या. जो अस्सल पण ट्रेंड-फॉरवर्ड असेल.'
advertisement
याच ट्रेंडला दुजोरा देत, लिवा फॅब्रिक्सचे हेड ऑफ डिझाइनर, नेल्सन जाफरी आणि फॅशन एक्सपर्ट अँड ब्रँड मॅनेजर कविता बाजपाई सांगतात की, बहुमुखी फॅब्रिक्स आणि स्टाइल्स या फेस्टिव्ह लूकला सहजपणे कसे अधिक आकर्षक बनवू शकतात.
या सिझनमध्ये ट्राय करा हे फेस्टिव्ह कुर्ता-डेनिम लूक..
रग्ड डेनिमसह पारंपारिक आकर्षण : सण म्हणजे ऊर्जा आणि स्वतःला व्यक्त करणे. रग्ड किंवा डिस्ट्रेस्ड डेनिम सिल्क किंवा चमकदार कुर्त्यासोबत घातल्यास एक बोल्ड पण मूळ भारतीय लूक तयार होतो. यावर नेहरू जॅकेट घालून किंवा मोठी स्टायलिश घड्याळ घालून तुम्ही तुमचा लूक आणखी चांगला करू शकता. घरगुती समारंभांसाठी हा लूक अगदी परफेक्ट आहे.
स्टाइल टिप - रग्ड डेनिमच्या बोल्डनेसला मॅरून, मस्टर्ड किंवा गडद हिरव्या रंगाच्या कुर्त्यासोबत संतुलित करा.
स्लिम फिटसह आकर्षक फेस्टिव्ह लूक : बारीक भरतकाम केलेला कुर्ता स्लिम फिट जीन्ससोबत घातल्यास तुमचा लूक अतिशय आकर्षक आणि आधुनिक दिसतो. त्याचबरोबर सणांचे सौंदर्यही टिकवून ठेवतो. हा लूक पूर्ण करण्यासाठी लेदर शूज किंवा कोल्हापुरी चप्पल घाला, ज्यामुळे पूर्व आणि पश्चिम संस्कृतीचा मिलाफ साधला जाईल.
स्टाइल टिप - मिनिमलिस्टिक पण आकर्षक लूकसाठी ऑल-व्हाइट लेयरिंग करा. पांढरा कुर्ता आणि पांढरी स्लिम फिट जीन्स ट्राय करा.
प्रत्येक प्रसंगासाठी योग्य डेनिम : कौटुंबिक लंचपासून ते गरबा नाईटपर्यंत मिड-वॉश किंवा गडद रंगाचे डेनिम प्रत्येक सणाच्या वेळेसाठी योग्य आहेत. दिवसा त्यांना पेस्टल रंगांच्या कुर्त्यासोबत आणि रात्री तेजस्वी रंगांच्या कुर्त्यासोबत घाला. बाह्या वर दुमडून, फेस्टिव्ह स्कार्फ घेऊन तुम्ही विधींपासून डान्स फ्लोअरपर्यंत सहजतेने जाऊ शकता.
स्टाइल टिप - तुमचा साधा बेल्ट काढून त्याऐवजी भरतकाम केलेला कंबरपट्टा किंवा बीडेड ब्रेसलेट्स घालून तुमच्या लूकला क्षणांत फेस्टिव्ह टच द्या.
फेस्टिव्ह फ्युजनमध्ये व्हायब्रंट फ्लोरल : लिवा फॅब्रिक्सपासून बनवलेली ही रेयॉन पिंक फ्लोरल प्रिंट शॉर्ट कुर्ती तुमच्या सणांच्या वॉर्डरोबमध्ये रंग आणि मोकळेपणाची भर घालते. तिचा श्वास घेणारा म्हणजेच ब्रीदेबल आणि सैलसर पोत नवरात्रीच्या डान्स नाईट्ससाठी खूप आरामदायक आहे. आकर्षक फेस्टिव्ह लूकसाठी ती डेनिम किंवा स्कर्टसोबत स्टाईल करा.
ज्वेल टोन्समध्ये एलिगंट प्रिंट्स : लिवा फॅब्रिक्सचा टील व्हिस्कोज स्ट्रेट प्रिंटेड कुर्ता हा सौंदर्य आणि सोयीचा परिपूर्ण मिलाफ आहे. त्याचा गडद टील रंग आणि बारीक प्रिंट्स सणांना शोभणारी समृद्धी देतात, तर त्याचे मोकळे फॅब्रिक तुम्हाला दिवसभर आरामदायक ठेवते. आधुनिक लूकसाठी डेनिमसोबत किंवा पारंपारिक लूकसाठी लेगिंग्ससोबत घाला.
फ्लोइंग ट्विस्टसह स्ट्राइप्स : ज्यांना साधे पण आकर्षक कपडे आवडतात, त्यांच्यासाठी लिवा फॅब्रिक्सची ही स्ट्राइप्ड फ्लोई कुर्ती कमीत कमी डिझाइनसोबत सहजता देते. आरामदायी आणि स्टायलिश असल्यामुळे सणाच्या गेट-टुगेदरसाठी ती आदर्श आहे. निवांत पण फॅशनेबल पार्टी लूकसाठी डेनिम किंवा प्लाझोससोबत घाला.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.