ठाणे: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपासलेल्या शिवकालीन युद्ध कलेला ऐतिहासिक महत्त्व आहे. आधुनिक काळात कराटे, ज्यूडो सारख्या प्रकारांमुळे ही भारतीय युद्धकला लोप पावतेय का? असा प्रश्न निर्माण होतो. पण, महाराष्ट्रातील काही संस्था हा शिवकालीन वारसा जतन करण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाण्यातील शिवगर्जना प्रतिष्ठान गेल्या 15 वर्षांपासून शिवकालीन युद्धकलेचे धडे देत आहे. या संस्थेच्या शिबिरातून मर्दानी खेळ आणि शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच शिवकालीन शस्त्र आणि नाण्यांचं प्रदर्शनही भरवलं जातं.
advertisement
शिवकालीन युद्धकलेमध्ये काय शिकवलं जातं?
शिवगर्जना प्रतिष्ठानकडून लाठी-काठी, पट्टा, भाला, खंजीर लढत, तलवार, द्वंद्वयुद्ध आदींचे प्राथमिक शिक्षण देण्यात येतं. तसेच युद्धनीती, युद्धकौशल्य, युद्धनेतृत्व आणि युद्धव्यवस्थापन या पैलूंचा प्रत्यक्ष त्या स्थळावर जाऊन अभ्यास करण्यासाठी किल्ल्यांना भेट दिली जाते. मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचा रोमांचकारी अनुभव घेण्यासाठी 4 जून 2022 रोजी प्रतापगड युद्धभूमीला भेट देण्यात आली होती. तसेच उमरठ येथील सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या गावी आणि समाधी स्थळाला भेट देण्यात आली. वय वर्ष 15 ते पुढील वयोगटातील सर्वांना ही कला शिकवली जाते, असे संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्रणय शेलार (भार्गव) यांनी सांगितले.
'शिवबाचं नाव' आता जगभर गाजतंय, मराठीतील 'बिग बजेट' गाणं धुमाकूळ घालतंय, Video
युद्धकला का शिकावी ?
स्वरंक्षणासाठी ही युद्धकला शिकणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. सोबतच स्वत:वरील आत्मविश्वास वाढवण्यासाठीही ते तितकचं महत्त्वाचं आहे. शस्त्र शिकल्याने कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर संयम ठेवण्याची सवय होते. शस्त्र शिकल्यामुळे आपल्यातील ताकदीची जाण20होते. तसेच ही ताकद कुठे आणि कशा प्रकारे वापरायची हे समजायला मदत होते. प्राचीन युद्धकलेत पारंगत झाल्यामुळे आत्मविश्वास वाढून महिला सशक्तीकरणालाही बळ मिळते. जेव्हापासून युद्धकला शिकलो तेव्हापासून स्वत:च्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकलो. तसंच स्वत:वरचा आत्मविश्वासही वाढला, असं या प्रतिष्ठानमध्ये युद्धकला शिकणारे सदस्य सांगतात.
Shiv Jayanti : महिला शाहिरांचा डफ घुमतोय मराठी मुलाखत; पोवाड्यातून करतायेत समाजप्रबोधन Video
शिवकालीन वारशाची जोपासणा
शिवकालीन शस्त्र चालवणं, ही युद्धकला शिकणं म्हणजे आपल्या महाराजांचा इतिहास खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीला पोहोचवण्यासारखं आहे. कारण या युद्धकलेची माहिती देण्यासोबत शिवकालीन शस्त्रांची माहिती, त्या शस्त्रांमागचं शास्त्र तसेच छत्रपती शिवरायांच्या काळात होणाऱ्या युद्धांमध्ये कशाप्रकारे या शस्त्रांचा वापर केला जायचा याचीही माहिती होते. त्यामुळे प्रत्येक पिढीला आपली ही युद्धकला शिकली पाहिजे, जाणली पाहिजे आणि प्रत्येक पुढच्या पिढीपर्यंत ती नक्कीच पोहोचवली पाहिजे, असे ओमकार सावंत सांगतात.