बराच वेळ बसून काम केल्यामुळे अंगदुखीसारखे त्रास जाणवू शकतो. पण त्याचबरोबर, आपण बराच वेळ बसून राहतो तेव्हा शरीरातील रक्ताभिसरण मंदावतं. त्यामुळे मेंदूला ऑक्सिजन आणि पोषक घटकांचा पुरवठा कमी होतो. यामुळे थकवा, चिडचीड, एकाग्रतेचा अभाव आणि स्मरणशक्ती कमी होऊ शकते.
Ghee Benefits : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठीचं पारंपरिक औषध, वाचा सविस्तर
advertisement
जास्त वेळ बसल्यानं मनावरही परिणाम होतो. यामुळे, विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. जास्त वेळ बसून राहिल्यानं ताण वाढतो. कामाचा ताण, जास्त वेळ स्क्रीन पाहणं आणि शारीरिक हालचालींचा अभाव या सर्वांमुळे मेंदू थकू शकतो.
यामुळे नैराश्य, चिंता आणि झोपेच्या समस्या देखील उद्भवू शकतात. शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय असलेल्या लोकांमधे सकारात्मक विचार आणि सर्जनशीलता देखील हळूहळू कमी होते. जीवनशैलीतल्या निष्क्रियतेमुळे, व्यायाम न केल्यामुळे, बाहेर न गेल्यामुळे आणि फास्ट फूडचा वापर वाढल्यामुळे मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो.
Bitter Gourd : कारलं का महत्त्वाचं ? पाहूया शरीरासाठी कारल्याचे औषधी उपयोग
मेंदू निरोगी ठेवण्यासाठी औषधोपचारांपेक्षा जास्त सक्रिय जीवनशैलीची आवश्यकता आहे. ही समस्या टाळण्यासाठी, दर तीस-चाळीस मिनिटांनी थोडा ब्रेक घ्या, फिरा आणि स्ट्रेचिंग करा.
दररोज योगासनं, प्राणायाम आणि थोडा व्यायाम केल्यानं मनाचा थकवा दूर होतो. याव्यतिरिक्त, पुरेशी झोप, संतुलित आहार आणि मोबाईल फोन सतत न वापरणं हे देखील मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे.
