TRENDING:

Skin Care : महागड्या क्रिम्सची गरज नाही, या सोप्या टिप्सनं चेहरा होईल स्वच्छ

Last Updated:

चेहरा दिवसातून दोनदा स्वच्छ धुणं खूप आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर चेहऱ्यावर मुरुमं होण्याचा धोका जास्त असतो. याव्यतिरिक्त, त्वचा तेलकट असेल तर मुरुमं होण्याची शक्यता जास्त असते. पाहूयात सौंदर्यतज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी दिलेल्या टिप्स.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : त्वचेची काळजी घेण्यासाठी खास तरुणाईसाठी सौंदर्यतज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी टिप्स शेअर केल्या आहेत. तरुणांना खास करुन चेहऱ्याच्या छिद्रांमधून जास्त प्रमाणात सेबम उत्पादनाची समस्या भेडसावते, ज्यामुळे मुरुमं येण्याचं प्रमाण वाढतं.
News18
News18
advertisement

मुरुमं होण्याची मुख्य कारणं म्हणजे प्रदूषण. प्रदूषणापासून स्वत:चं रक्षण करायचं असेल तर चेहरा दिवसातून दोनदा स्वच्छ धुणं खूप आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर चेहऱ्यावर मुरुमं होण्याचा धोका जास्त असतो.

याव्यतिरिक्त, त्वचा तेलकट असेल तर मुरुमं होण्याची शक्यता जास्त असते. पाहूयात सौंदर्यतज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी दिलेल्या टिप्स.

Iron Deficiency: त्वचेत झालेले बदल देतात लोह कमतरतेचे संकेत, जाणून घ्या लक्षणं

advertisement

दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ करण्याचं महत्त्व - दिवसाच्या सुरुवातीला सकाळी आणि घरी आल्यावर चेहरा स्वच्छ धुवा. ऑईल फ्री क्लीन्झर आणि कडुनिंब आणि तुळस असलेले क्लीन्झर वापरण्याला प्राधान्य द्या.

मुरुमांवर अँटी-एक्ने आयुर्वेदिक क्रीम किंवा लोशन सारखी स्पॉट ट्रीटमेंट करा.

त्वचेला मॅटिफायिंग मॉइश्चरायझरनं मॉइश्चरायझ करा यामुळे ऑईल फ्री लूक येईल आणि चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल येणं नियंत्रित होईल.

advertisement

दररोज सकाळी बाहेर जाण्यापूर्वी SPF 30 किंवा त्याहून अधिक लावा.

आठवड्यातून एकदा एक्सफोलिएशन केल्यानं मृत त्वचेच्या पेशी काढून टाकल्या जातात, जेणेकरून छिद्रं बंद होणार नाहीत आणि सर्व घाण निघून जाईल.

आठवड्यातून दोनदा मुलतानी मातीचा मास्क लावा. एक चमचा मुलतानी माती घ्या आणि त्यात गुलाबपाणी, चिमूटभर चंदन पावडर आणि चिमूटभर हळद पावडर मिसळा. या तिन्ही घटकांमुळे त्वचा दुरुस्तीसाठी आणि मुरुमं कमी करण्यासाठी मदत होते. मास्क कोरडा होईपर्यंत राहू द्या आणि नंतर धुवा.

advertisement

Processed Food: चिप्स, बिस्किटं खाताय ? आताच व्हा सावध, वाचा सविस्तर

चेहऱ्याला वारंवार स्पर्श करू नका कारण यामुळे स्पर्श केलेल्या वस्तूंवरचे बॅक्टेरिया चेहऱ्यावर जातात आणि यामुळे चेहऱ्यावर मुरुम येण्याची शक्यता वाढते.

मेकअप ब्रश आणि अ‍ॅप्लिकेटर ब्रश नेहमी कोमट पाण्यानं स्वच्छ करा.

चेहऱ्यावर बॅक्टेरिया जाऊ नयेत म्हणून फोन हँड सॅनिटायझरनं स्वच्छ करा.

advertisement

चष्मा वापरत असाल तर तो नियमितपणे स्वच्छ करा.

त्वचा निरोगी राखण्यासाठी भरपूर पाणी आणि व्हिटॅमिन सी समृद्ध फळांचा समावेश आहारात असू द्या.

चेहरा धुण्यासाठी कधीही गरम पाणी वापरू नका; थंड किंवा कोमट पाणी वापरा कारण यामुळे चेहऱ्यावरील जळजळ कमी होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

केमिकलयुक्त स्किनकेअर किंवा इतर उत्पादनं वापरणं टाळा, आयुर्वेदिक उत्पादनं वापरण्यावर भर द्या असा सल्लाही शहनाझ यांनी दिला आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : महागड्या क्रिम्सची गरज नाही, या सोप्या टिप्सनं चेहरा होईल स्वच्छ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल