Processed Food : अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचा मोह टाळा, जाणून घ्या तब्येतीवर होणारे दुष्परिणाम

Last Updated:

पॅकेज्ड आणि प्रक्रिया केलेल्या अन्नामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो आहे. लॅन्सेटच्या अभ्यासात या अन्नपदार्थांमुळे होणाऱ्या लठ्ठपणा, टाइप-2 मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या धोक्यांबद्दल इशारा देण्यात आला आहे.

News18
News18
मुंबई : निरोगी, सकस जेवा, तब्येत चांगली ठेवा हा निरोगी आरोग्यासाठीचा मंत्र आहे. पण सध्या सर्रासपणे चिप्स, बिस्किटं, पॅकेज्ड ड्रिंक्स, इन्स्टंट नूडल्सचं प्रमाण स्वयंपाकघरात वाढलेलं दिसतंय. हे सगळे खाद्य पदार्थ अल्ट्रा प्रोसेस्ड फूड मानले जातात. हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहेत हे माहित असूनही, अजूनही स्वयंपाकघरात याचं प्रमाण वाढताना दिसतंय.
अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न हे भारतात लठ्ठपणा आणि मधुमेह वाढण्याचं हे प्रमुख कारण ठरत चाललंय. संसर्गजन्य आजारांना बळी पडू नये असं वाटत असेल, तर अति-प्रक्रिया केलेल्या अन्नाबद्दल जागरूक राहण्याची नितांत गरज आहे असं निरीक्षण लॅन्सेट जर्नलमधे व्यक्त करण्यात आलं आहे.
advertisement
प्रिझर्वेटिव्ह एडिटीव्ह, रंग, स्वीटनर्स आणि इमल्सीफायर्स असे नेहमीच्या स्वयंपाकात न आढळणारे घटक अशा पदार्थांमधे आढळतात. बिस्किटं, पेस्ट्री, सॉस, इन्स्टंट सूप, नूडल्स, आईस्क्रीम, ब्रेड, फिजी ड्रिंक्स यांसारखे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड अनेक घरांमधे दररोज वापरले जातात.
सध्या फायबर आणि प्रथिनांपेक्षा जास्त साखर, हानिकारक चरबी आणि मीठाचं प्रमाण वाढत चाललंय. महत्त्वाचं म्हणजे, हे पॅकेज केलेलं आणि कॅलरीयुक्त अन्न लहान शहरं आणि खेड्यांपर्यंत देखील पोहोचल्याचं या सर्वेक्षणात आढळलं आहे.
advertisement
द लॅन्सेटमधे प्रकाशित झालेल्या या अभ्यासात, 43 जागतिक तज्ज्ञांनी प्रक्रिया केलेल्या अन्नाचे दुष्परिणाम तपशीलवार सांगितलेत. यामुळे बारा प्रकारच्या संभाव्य समस्या होवू शकतात असं निरीक्षण नोंदवण्यात आलंय.  यामुळे टाइप 2 मधुमेह, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी मूत्रपिंडाचा आजार, नैराश्य आणि अकाली मृत्यू यासारख्या आजारांना तोंड द्यावं लागू शकतं.
अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नामुळे दीर्घकालीन आजारांचा धोका वाढतो. आयसीएमआर इंडिया डायबिटीज स्टडी (2023) नुसार, 28.6 टक्के भारतीय लठ्ठ आहेत.
advertisement
सध्या 11.4 टक्के भारतीयांना मधुमेह आहे आणि 15.3 टक्के लोकांना मधुमेहापूर्वीचा आजार आहे.
NHFS-5 मधे 3.4 टक्के मुलं लठ्ठ असल्याचं आढळून आलं, तर NHFS-4 मध्ये हे प्रमाण 2.1 टक्के होतं.
अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमधे साखर, फॅट आणि मीठ जास्त असल्यानं त्याची चव वाढते, ज्यामुळे ते खाण्याचं आकर्षण वाटतं.
advertisement
या पदार्थांमधे रिफाइंड कार्ब्स आणि साखरेचं प्रमाण जास्त असल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्यानं वाढू शकतं, ज्यामुळे शरीराच्या इन्सुलिन प्रतिसादावर परिणाम होतो. चयापचयावर होणाऱ्या या परिणामामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका निर्माण होऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Processed Food : अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचा मोह टाळा, जाणून घ्या तब्येतीवर होणारे दुष्परिणाम
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement