Dates : त्वरीत एनर्जी देणारा पौष्टिक खाऊ, खजूर खा, तंदुरुस्त राहा, जाणून घ्या खजुराचे आरोग्यदायी फायदे

Last Updated:

खजूर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असले तरी मुख्यत: खजूर उष्ण असतात. म्हणून ते कमी प्रमाणात खावेत. मधुमेहींनीही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच खजूर खावेत. कारण त्यात साखरेचं प्रमाण जास्त असतं.

News18
News18
मुंबई : थोडं बरं वाटत नसलं किंवा थोडी ताकद कमी वाटत असेल तर खजूर खायला दिला जातो. खजूर दिसायला लहान असला तरी आरोग्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. खजुरामधे अनेक आवश्यक पोषक घटक असतात, ज्यामुळे आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते.
दररोज फक्त 2-3 खजूर खाण्यास सुरुवात केली तर आरोग्यासाठी हे खूपच उपयुक्त ठरेल. जाणून घेऊया दररोज खजूर खाण्याचे फायदे.
खजुरामधे ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज सारख्या नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असतं. या साखरेमुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.
advertisement
ज्यांना जलद ऊर्जा वाढण्याची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी खजूर हा सोपा आणि उत्तम पर्याय आहे. दोन-तीन खजूर खाल्ल्यानं दिवसभर उत्साही वाटण्यास मदत होते. हे विशेषतः खेळाडू आणि जिमला जाणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे.
पचनसंस्था - पचनाच्या समस्या असतील तर खजूर उपयुक्त ठरतात. कारण खजुरामधे भरपूर प्रमाणात फायबर असतं. या फायबरमुळे मल मऊ होतं, बद्धकोष्ठता दूर होते आणि आतडी स्वच्छ करण्यास मदत होते. खजूर नियमितपणे खाल्ल्यानं पचनक्रिया चांगली राहते आणि अपचन, गॅस यासारख्या पोटाच्या समस्या कमी होतात. खजुरांमुळे आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना देखील पोषण मिळतं.
advertisement
हाडं - वय वाढत असताना हाडं कमकुवत होतात, खजुरातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॉपर आणि सेलेनियम सारखी खनिजं हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. कॅल्शियममुळे हाडं मजबूत राहतात, तर मॅग्नेशियममुळे हाडांची घनता राखण्यास मदत होते. दररोज खजूर खाल्ल्यानं ऑस्टियोपोरोसिससारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
हृदय - हृदयाच्या आरोग्यासाठीही खजूर महत्त्वाचे आहेत. खजुरातील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. त्यात असलेले फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी मदत करतात. यामुळे धमन्यांमधे प्लेक जमा होण्याचा धोका कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
advertisement
अशक्तपणा- लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अशक्तपणा भरुन काढण्यासाठी खजूर चांगला. विशेषतः महिलांसाठी खजूर उपयुक्त. खजूर हा लोहाचा उत्कृष्ट नैसर्गिक स्रोत आहे. दररोज दोन-तीन खजूर खाल्ल्यानं शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते.
खजुरांमुळे लाल रक्तपेशींच्या निर्मितीला चालना मिळते आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुधारतो. ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणाच्या तक्रारी दूर होतात.
advertisement
खजूर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असले तरी मुख्यत: खजूर उष्ण असतात. म्हणून ते कमी प्रमाणात खावेत. मधुमेहींनीही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच खजूर खावेत. कारण त्यात साखरेचं प्रमाण जास्त असतं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dates : त्वरीत एनर्जी देणारा पौष्टिक खाऊ, खजूर खा, तंदुरुस्त राहा, जाणून घ्या खजुराचे आरोग्यदायी फायदे
Next Article
advertisement
ZP Election : महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं...
महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं
  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

View All
advertisement