Eye Care : डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या टिप्स, डोळ्यांची जळजळ होईल कमी

Last Updated:

मोबाईल फोन, लॅपटॉप आणि टीव्ही स्क्रीनमुळे आपल्या डोळ्यांवर परिणाम होतो. बरेच जण डोळे कोरडे होणं, डोळ्यांत जळजळ होणं किंवा डोळ्यांना वारंवार खाज सुटण्याची तक्रार करतात. जाणून घेऊया डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काय करायचं ?

News18
News18
मुंबई : दिवसातला खूप वेळ मोबाईल फोन, लॅपटॉप आणि टीव्ही स्क्रीनसमोर घालवत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी. कारण याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. बरेच जण डोळे कोरडे होणं, डोळ्यांत जळजळ होणं किंवा डोळ्यांना वारंवार खाज सुटण्याची तक्रार करतात.
आपण एका मिनिटात साधारणपणे, पंधरा-वीस वेळा डोळे मिचकावतो. यामुळे डोळ्यांवरील नैसर्गिक अश्रूंचा थर समान पद्धतीनं वितरित होण्यास मदत होते आणि यामुळे डोळे ओलसर ठेवणं शक्य होतं.
आपण सतत स्क्रीनकडे पाहतो तेव्हा चार-सहा वेळाच डोळे मिचकावतो. यामुळे अश्रू संपूर्ण डोळ्यात पसरत नाहीत आणि यामुळे कोरडेपणा येतो. यामुळे प्रथम, दर वीस मिनिटांनी दहा वेळा डोळे मिचकावण्याचा सल्ला डॉक्टर देतात. डोळे मिचकावताना डोळे पूर्णपणे बंद असल्याची खात्री करा. यामुळे तुमचे डोळे ओले राहतील आणि जळजळ होणार नाही किंवा खाज सुटणार नाही.
advertisement
डोळे खाजत असतील तर तळवे एकमेकांना घासून त्यांना गरम करा, नंतर ते डोळ्यांवर हलक्या हातानं तीस सेकंदांसाठी ठेवा. यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळेल आणि ताण कमी होईल. शुद्ध, रसायनमुक्त गुलाब पाण्यात कापसाचे गोळे भिजवून ते डोळ्यांवर दहा मिनिटं ठेवल्यानं डोळ्यांना आराम मिळतो आणि जळजळ कमी होते.
advertisement
दररोज रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांच्या कोपऱ्यांवर थोडंसं शुद्ध तूप लावू शकता. यामुळे डोळ्यांभोवतीच्या त्वचेला पोषण मिळेल आणि खाज सुटणार नाही.
एसीमधे बराच वेळ घालवत असाल तर खोलीत एक वाटी पाणी किंवा ह्युमिडिफायर ठेवा जेणेकरून हवा कोरडी होणार नाही.
आवळा, जवस, अक्रोड आणि ओमेगा-3 असलेले पदार्थ खा. हे पदार्थ डोळ्यांसाठी फायदेशीर असतात. यामुळे अश्रूंच्या थराची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Eye Care : डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या टिप्स, डोळ्यांची जळजळ होईल कमी
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement