Smriti Mandhana-Palash Muchhal: क्रिकेट जगतातली 'ती' क्वीन, तो म्युझिकचा किंग, कसे जुळले सूर, स्मृती-पलाशची हटके LOVE STORY

Last Updated:
Smriti Mandhana-Palash Muchhal LOVE STORY: क्रिकेट आणि संगीत विश्वातील या दोन प्रेमींची लव्हस्टोरी सुरू कशी झाली असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.
1/14
मुंबई: भारतीय क्रिकेट जगताची स्टार बॅट्समन स्मृती मंधाना आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न सध्या चर्चेत आहे. ही लोकप्रिय जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकणार होती, पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते.

advertisement
2/14
२३ नोव्हेंबरला ते दोघे लग्न करणार होते, पण ऐनवेळी एका कारणामुळे दोघांनाही आपला विवाह सोहळा पुढे ढकलावा लागला. स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने हा निर्णय घेण्यात आला.

3/14
याच निमित्ताने क्रिकेट आणि संगीत विश्वातील या दोन प्रेमींची लव्हस्टोरी सुरू कशी झाली असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

4/14
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांची लव्हस्टोरी २०१९ मध्ये सुरू झाली. सुमारे ६ वर्षे डेटिंग केल्यानंतर ते लग्नाच्या बेडीत अडकणार होते. दोघांची पहिली भेट एका खाजगी संगीत इव्हेंटमध्ये झाली होती.

5/14
पलाश त्याची बहीण पलक मुच्छलसोबत तिथे परफॉर्म करत होता. याच वेळी एका कॉमन मित्राच्या माध्यमातून त्याची स्मृतीसोबत ओळख झाली.

6/14
पलाशने या इव्हेंटमध्ये आपले एक अनरिलीज्ड गाणे गायले होते. यावेळी पलाशचा आवाज स्मृतीला इतका आवडला की, त्या आवाजावर ती फिदा झाली.

7/14
या भेटीतून दोघांची मैत्री सुरू झाली आणि या मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. पाच वर्षे डेट केल्यानंतर २०२४ मध्ये दोघांनीही आपले नाते अधिकृत केले.

8/14
पलाशने स्मृतीला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर थेट मैदानावर लग्नासाठी प्रपोज केलं होतं. या रोमँटिक क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ कपलने सोशल मीडियावर शेअर केले होते.

9/14
स्मृतीच्या सांगली या होमटाऊनमध्ये त्यांचे लग्न होणार होते. त्यांच्या हळदी, मेहंदी आणि संगीत यांसारख्या प्री-वेडिंग विधींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

10/14
प्री-वेडिंग सोहळे सुरू असतानाच, २३ नोव्हेंबरच्या लग्नाच्या काही दिवस आधी स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांची तब्येत अचानक बिघडली. वडिलांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे स्मृती आणि पलाशने तातडीने लग्न पोस्टपोन करण्याचा निर्णय घेतला.

11/14
स्मृती आणि पलाशचे लग्न पोस्टपॉन झाल्यानंतर एकच गदारोळ झाला आहे. सोशल मीडियावर अशा बातम्या पसरत आहेत की, पलाशने स्मृतीला लग्नाच्या आदल्या रात्री चीट केल्यामुळे तिच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि त्यांचे लग्न पोस्टपोन झाले. दुसऱ्या दिवशी पलाशलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले.

12/14
अशातच काही चॅट्सही व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये पलाश कथितरित्या एका मुलीशी फ्लर्ट करत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर धुमाकूळ उडाला आहे. मात्र अद्याप या संपूर्ण प्रकरणावर कपलने कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.

13/14
मिळालेल्या माहितीनुसार, आता श्रीनिवास मंधाना यांच्या तब्येतीत मोठी सुधारणा झाली आहे. २५ नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांनी केलेली एंजियोग्राफी नॉर्मल आल्याने कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. त्यांची तब्येत आता पूर्णपणे स्थिर आहे.

14/14
या परिस्थितीत सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवा खऱ्या आहेत का? आता स्मृती आणि पलाशचे लग्न कधी होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement