Footwear Guide : स्पोर्ट शूज खरेदी करताना 'या' चुका टाळा! पायांना होईल गंभीर इजा, जावं लागेल डॉक्टरांकडे..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Proper Footwear Guide : वर्कआउट, रनिंग किंवा कोणत्याही खेळात चांगला परफॉर्मन्स हवा असेल तर योग्य स्पोर्ट्स शूज अत्यंत गरजेचे असतात. चुकीचे शूज निवडल्यास लगेच पायदुखी, टाच दुखणे, नी पेन किंवा दीर्घकालीन फुट प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात. त्यामुळे शूजची डिझाइन आणि लुकपेक्षा त्यांची आरामदायकता, ग्रिप आणि सपोर्ट अधिक महत्त्वाचे ठरतात. चला पाहूया तुमच्यासाठी योग्य शूज कसा निवडावा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
परफेक्ट स्पोर्ट्स शूज कसे निवडावेत : शूज खूप टाईट किंवा लूज नसावे. तुमच्या बोटांना हलका स्पेस मिळाला पाहिजे पण पाय घसरू नये. सोलची लवचिकता, कुशनिंग, आर्च सपोर्ट, हील सपोर्ट आणि ग्रिप व्यवस्थित तपासावी. तसेच शूज तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीला, पायाच्या शेपला आणि वजनाला योग्य असणे आवश्यक आहे. योग्य शूज निवडल्यास जखमा, पायदुखी आणि नी पेनसारख्या अनेक समस्या सहज टाळता येतात.
advertisement


