टीम इंडियाच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर, कुटुंबातील व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाच्या माजी खेळाडूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.कारण या खेळाडूच्या कुटुंबातीस एका व्यक्तीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे.या घटनेने स्टार खेळाडूच्या घरावर शोककळा पसरली आहे.
मुंबई : गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडियमवरील दुसऱ्या टेस्ट सामन्यात साऊथ आफ्रिकाने 408 धावांनी भारताचा पराभव केला. या विजयासह साऊथ आफ्रिकने 2-0ने ही टेस्ट मालिका जिंकली आहे. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा हार्टब्रेक झाला आहे. असे असतानाच एक दु:खद बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या माजी खेळाडूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.कारण या खेळाडूच्या कुटुंबातीस एका व्यक्तीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे.या घटनेने स्टार खेळाडूच्या घरावर शोककळा पसरली आहे.
हा माजी खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून माजी भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आहे. पुजाराचा मेहुणा जीत रसिकभाई पाबारी यांनी बुधवारी राजकोट येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मालवीयनगर पोलिसांच्या पथकाने त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.आता पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून घटनेचा तपास सूरू केला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरापुर्वी याच दिवशी 26 नोव्हेंबर 2024 रोजी जीतच्या होणाऱ्या बायकोने मालवीय नगर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत जीतवर लग्नाच्या बहाण्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. ही घटना साखरपूड्याआधी घडली होती. तसेच या घटनेनंतर लग्न मोडण्यात आल्याचा दावा तिने केला होता. दरम्यान गेल्यावर्षीची तक्रारीची तारीख आणि आजची तारीख पाहता त्याने या घटनेमुळे आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे.
advertisement
या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जीत गेल्या वर्षभरापासून कायदेशीर खटल्याचा सामना करत होता आणि तो बराच ताणतणावात होता.पण आत्महत्येमागील नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि पुढील चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
कोण आहे पुजाराचा मेहुणा ?
जीत पाबारी हा राजकोटमधील एका प्रसिद्ध कुटुंबातील होता. पाबारी कुटुंब मूळचे जामजोधपूरचे आहे परंतु गेल्या दोन दशकांहून अधिक काळ राजकोटमध्ये राहत आहे, जिथे ते कापूस जिनिंग कारखाना चालवतात. जीतचे वडील रसिकभाई पाबारी हे एक व्यापारी आहेत.
advertisement
या दुर्घटनेमुळे पुजारा आणि त्यांची पत्नी पूजा यांनाही मोठा धक्का बसला आहे.गोंडलमध्ये जन्मलेली पूजा एका जवळच्या कुटुंबातून येते, तिच्यात एक धाकटा भाऊ आणि एक धाकटी बहीण आहे. तिने दहावीपर्यंत अबूमधील सोफिया स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले,अहमदाबादमध्ये पुढील शिक्षण घेतले आणि नंतर मुंबईत पदव्युत्तर पदवी मिळवली. चेतेश्वरशी लग्न करण्यापूर्वी तिने एका वर्षासाठी एका बहुराष्ट्रीय कंपनीतही काम केले होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 4:57 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
टीम इंडियाच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर, कुटुंबातील व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल


