Pune Crime: आधी दुबई मग टांझानिया, तांब्याची भांडी बनवणाऱ्या पुण्याच्या व्यावसायिकाला 3 कोटीचा गंडा; कसा केला कांड?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
ओळख झाल्यानंतर त्यांनी दुबईमध्ये बोलवून आणि तिथून पुढे टांझानियाला नेत आरोपीने 75 टन स्क्रॅप मटेरियलचा कच्चा माल दाखवला.
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : पुण्यात एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका व्यावसायिकाची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्यवसायाला लागणार कच्चा माल दुबईहून देतो असे सांगत पुण्यातील व्यवसायिकाला तीन कोटींचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी भुपेंद्र सिंह उर्फ संजय कुमार राघवला पश्चिम बंगालमधून पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधीर बराटे यांचा पुण्यातील रविवार पेठेत तांब्याची भांडे बनवण्याचा व्यवसाय आहे. त्यासाठी लागणाऱ्या कच्चा माल हा ते मुंबईवरून मागवत होते. दरम्यान त्यांची ओळख आरोपी भुपेंद्र सिंह उर्फ संजय कुमार राघव आणि त्यांचा मुलगा प्रणवीरसिंग संजय कुमार राघव यांच्याशी झाली. या दोघा बाप लेकाने फिर्यादी बराटे यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच ऑफिस दुबईमध्ये असल्याचे सांगितले.
advertisement
दुबईला बोलवून टांझानियाला नेलं
ओळख झाल्यानंतर त्यांनी दुबईमध्ये बोलवून आणि तिथून पुढे टांझानियाला नेत आरोपीने 75 टन स्क्रॅप मटेरियलचा कच्चा माल दाखवला. हा कच्चा माल आम्हाला भारतात निर्यात करायचा आहे हे सांगत फिर्यादी बराटे यांच्या कडून तब्बल 3 कोटी 79 लाख 77 हजार 375 रुपयांना गंडा घातला आहे. कच्चा माल न मिळाल्याने फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेत या बाबत तक्रार दाखल केली.
advertisement
बंगालमधून आरोपीला घेतलं ताब्यात
तक्रारीनंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. बँक व्यवहार, मोबाईल लोकेशन आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. तो पश्चिम बंगालमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिथे जाऊन त्याला अटक केली. आरोपी भुपेंद्र सिंह उर्फ संजय कुमार राघव याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
advertisement
व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा
या घटनेनंतर पोलिसांनी व्यावसायिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही नवीन पुरवठादाराशी व्यवहार करताना त्याची सखोल चौकशी, कागदपत्रांची पडताळणी आणि अधिकृत करार केल्याशिवाय मोठ्या रकमेचे व्यवहार करू नयेत. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून अशा आंतरराज्य फसवणूक टोळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे.
काही दिवसापूर्वी आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांचे रॅकेट उद्ध्वस्त
advertisement
घरबसल्या लाखो रुपये कमविण्याच्या हव्यासापोटी अनेकजण ऑनलाईन टास्कच्या मोहात अडकल्याने त्यांना कोट्यवधींचा चुना लागलाल्याच्या घटना तुम्ही एकल्या असतील. असे एक दोन नव्हे तर देशातील तब्बल 3 कोटी उच्च शिक्षित तरुण अशाच एका ऑनलाइन फ्रॉडच्या जाळ्यात फसलेत अन् या सर्वांना गंडवणाऱ्या एका आंतररष्ट्रीय सायबर गुन्हेगारांचे रॅकेट पिंपरी चिंचवड पोलिसांनी उद्ध्वस्त करत काही आरोपींनी जेरबंद केलंय.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 26, 2025 5:21 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: आधी दुबई मग टांझानिया, तांब्याची भांडी बनवणाऱ्या पुण्याच्या व्यावसायिकाला 3 कोटीचा गंडा; कसा केला कांड?


