BIGG BOSS 19: 'तिला बरोबर माहीत आहे कोणतं कार्ड...', घराबाहेर येताच कुनिका सदानंदने तान्या मित्तलला केलं EXPOSE, म्हणाली...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Kunickaa Sadanand on Tanya Mittal: बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर कुनिकाने अनेक मुलाखती दिल्या आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत तिने तान्याबद्दल शॉकिंग खुलासे केले आहेत.
मुंबई: 'बिग बॉस १९' चा फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सध्या घरात सात स्पर्धकांमध्ये तिकीट टू फिनाले मिळवण्यासाठी चढाओढ पाहायला मिळतेय. अशातच गौरव खन्ना हा फिनाले वीकमध्ये जाणारा पहिला स्पर्धक ठरला आहे. गेल्या आठवड्यातच कुनिका सदानंद या शोमधून आऊट झाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर कुनिकाने अनेक मुलाखती दिल्या आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत तिने तान्याबद्दल शॉकिंग खुलासे केले आहेत.
एका मुलाखतीत कुनिकाने अंतिम फेरीच्या इतक्या जवळ येऊन घराबाहेर पडावे लागल्याचे दुःख व्यक्त केले. शोदरम्यान तिच्यावर झालेल्या आरोपांवरही तिने भाष्य केले. कुनिका म्हणाली, "मी घरात कधीही एज कार्ड खेळले नाही, पण माझ्या अनुभवामुळे आणि वयामुळे मला नक्कीच वाईट वाटले... मी रात्रीच्या वेळी माझ्या अंथरुणात गुपचूप रडायचे." यावेळी कुनिकाला तान्या आणि फरहाना भट्ट या दोघींमध्ये फरहाना जास्त खरी वाटली, जी सतत भांडणे करत असायची. कुनिकाच्या मते, तान्यापेक्षा फरहाना जास्त प्रामाणिक आहे.
advertisement
तान्याच्या संस्कारांवर केलेल्या वाक्यावर दिले स्पष्टीकरण
तान्याच्या संस्कारांबद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवरही कुनिकाने स्पष्टीकरण दिले. कुनिका म्हणाली, "'संस्कार' हा चुकीचा शब्द होता." पण तिची खरी चिंता तान्याला मिळालेले स्वातंत्र्य कमी असण्याबद्दल होती. "तुझ्या आई-वडिलांनी तुला स्वतंत्र बनवले नाही," हेच तिला म्हणायचे होते. कुनिकाच्या मते, तान्याने तिला सांगितलेल्या गोष्टीनुसार, तिचे संगोपन बिघडलेल्या मुलाप्रमाणे झाले आहे आणि ती एका लाडावलेल्या व्यक्तीसारखे वागते. ती कधीही कपडे किंवा दागिने पुन्हा घालत नाही.
advertisement
advertisement
तान्या मित्तलची किळसवाणी विचारसरणी
कुनिकाने तान्यासोबत झालेल्या एका खासगी चर्चेचा खुलासा केला, जी तिच्या स्वभावावर प्रकाश टाकते. कुनिकाने तान्याला तिच्या '१०,००० चौरस फूट' क्षेत्रात ठेवलेले काही कपडे किंवा दागिने गरीब मुलींच्या लग्नासाठी किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुलींना दान करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर तान्याने, "नाही, नाही, मी नाही देऊ शकत, मी पझेसिव्ह आहे," असे उत्तर तान्याने दिले. यावर कुनिका म्हणाल्या, "ही खूपच किळसवाणी विचारसरणी आहे."
advertisement
कुनिकाच्या मते, तान्या खूप हुशारीने खेळत आहे. तिला कधी कोणते कार्ड वापरायचे, हे बरोबर माहीत आहे. हा भावनिक नव्हे, तर गेम प्लानचा भाग आहे, असे कुनिकाने ठामपणे सांगितले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 5:28 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
BIGG BOSS 19: 'तिला बरोबर माहीत आहे कोणतं कार्ड...', घराबाहेर येताच कुनिका सदानंदने तान्या मित्तलला केलं EXPOSE, म्हणाली...


