Mokhada Leopard News: नातवासाठी आजी बिबट्याशी भिडली… घराच्या अंगणातच थरार, पालघरमध्ये अंगावर काटा आणणारी घटना

Last Updated:

Mokhada Leopard Attack News: सोमवारी सकाळी खोच पिंपळपाड्याच्या ग्रामपंचायत हद्दीत घडलेल्या एका घटनेत नऊ वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला आहे. घराच्या कोपऱ्यात बसलेल्या मुलावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

Mokhada Leopard News: नातवासाठी आजी बिबट्याशी भिडली… घराच्या अंगणातच थरार, पालघरमध्ये अंगावर काटा आणणारी घटना
Mokhada Leopard News: नातवासाठी आजी बिबट्याशी भिडली… घराच्या अंगणातच थरार, पालघरमध्ये अंगावर काटा आणणारी घटना
गेल्या काही महिन्यांपासून मोखाडा (Mokhada) तालुक्यात बिबट्याच्या (Leopard) हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच मालिकेत सोमवारी सकाळी खोच पिंपळपाड्याच्या ग्रामपंचायत हद्दीत घडलेल्या एका घटनेत नऊ वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला आहे. घराच्या कोपऱ्यात बसलेल्या मुलावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याच्या आजीने वेळीच केलेल्या आरडा ओरडेमुळे बिबट्या पसार झाला आणि चिमुकल्याचा जीव वाचला. आजीने केलेल्या कामगिरीमुळे सर्वच स्तरातून आजीचे कौतुक केले जात आहे.
मोखाडा तालुक्यातील खोच पिंपळपाडा येथील संकेत सुनील भोये (वय 9) हा सोमवारी पहाटे सहा वाजता शाळेसाठी उठला होता. पहाटे थंडी जास्त असल्यामुळे संकेत घराच्या अंगणात शेकोटी पेटवुन शेकत बसला होता. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कुंपणावरून उडी मारत संकेतवर झडप घालण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकाराने घरातील आजी आणि इतर सदस्य घाबरून गेले. परंतु संकेतच्या आजीने लगेचच तात्काळ आरडाओरड सुरू करताच त्याने तिथून पळ काढला. त्यामुळे संकेतचा जीव थोडक्यात वाचला. पळताना त्याचा गुडगा जखमी झाला असला तरी गंभीर दुखापत टळली आहे.
advertisement
आजीचा आरडा ओरड आणि आक्रांतामुळे सोबतच कुटुंबातील आणि आजूबाजूच्या लोकांनी बिबट्याच्या दिशेने धाव घेतल्यामुळे भेदरलेल्या बिबट्याने तेथुन पळ काढत जंगलाची वाट धरली. संकेतचे दैव बलवत्तर आणि आजीच्या धाडस व सतर्कतेमुळे नातवाचा जीव वाचला. "रोजच्या प्रमाणे सोमवारी सुद्धा सकाळी शेकोटी पेटवण्यासाठी संकेत घराच्या बाहेर आला होता. थंडी जास्त असल्यामुळे तो शेकोटीच्या समोर बसलेला होता. त्याला बिबट्याने बघितले आणि कुंपणावरून उडी मारून धावून आला. परंतु माझ्या आईसह घरातील सगळ्याच व्यक्तींनी आरडाओरड केल्याने बिबट्या तिथून पळून गेला. संकेतला कोणतीही इजा झाली नाही, परंतु पळताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. या प्रकारामुळे आम्ही अत्यंत घाबरलो आहोत. वनविभागाने त्वरित उपाययोजना करावी," अशी मागणी संकेतचे काका (केशव भोये) यांनी केली आहे.
advertisement
दरम्यान, संकेतच्या धाडसी आजीचे सर्वत्र कौतुक होत असून संध्याकाळी लहान मुले आणि नागरिकांनी विनाकारण फिरणे टाळावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. रात्री सायरन वाजवत गाडीने गाव पाड्यावर गस्त घालत असल्याची माहिती सुद्धा वन विभागाने सांगितली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mokhada Leopard News: नातवासाठी आजी बिबट्याशी भिडली… घराच्या अंगणातच थरार, पालघरमध्ये अंगावर काटा आणणारी घटना
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement