Pankaja Munde Palakmantri: पंकजा मुंडे पुन्हा मनातलं बोलल्या, जाहीर सभेत व्यक्त केली इच्छा; म्हणाल्या बीडची पालक...
- Published by:Prachi Amale
- Reported by:SURESH JADHAV
Last Updated:
भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मनातील बीड जिल्ह्याची पालकमंत्री होण्याची सुप्त इच्छा प्रगट केल्याची चर्चा होत आहे.
बीड: भाजप मंत्री पंकजा मुंडे जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री असल्या, तरी त्यांची बीडचं पालकमंत्री मिळवण्याची इच्छा ही लपून राहत नाही. त्यांचे बीडवरील प्रेम वारंवार उफाळून येतं. असंच बीडच्या एका कार्यक्रमात त्यांनी आज सूचक वक्तव्य केले आहे. मी बीड जिल्ह्याची आजन्म पालक, बीड जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी बैठका घेणार अधिकाऱ्यांना कामाला लावणार आहे. त्यानंतर भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मनातील बीड जिल्ह्याची पालकमंत्री होण्याची सुप्त इच्छा प्रगट केल्याची चर्चा होत आहे.
बीड जिल्ह्याची पालकमंत्री पद हे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. ऐन निवडणुकीत असे वक्तव्य केल्याने बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पदावरून पुन्हा होऊ लागली आहे. बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार सभेत बोलत होत्या.
बीड जिल्ह्याची आजन्म पालक: पंकजा मुंडे
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, बीड जिल्ह्याची मी संपर्क मंत्री आहे. बीड जिल्ह्याची मी पालक आहे. पालकमंत्री मी जालन्याची आहे. बीड जिल्ह्याची आजन्म पालक आहे. मंत्री म्हणून मी प्रत्येक ठिकाणी बैठक घेणार आहे.. अधिकाऱ्यांना कामाला लावणार आहे.. नगराध्यक्षांना संरक्षण देणार आहे.
advertisement
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
राजकारणामधील पुढे गेले आहे. ज्युनिअर लोक आले आहेत. दर तीन महिन्याला मी बीड नगरपालिकेची बैठक घेणार आहे.चांगला निधी आणून चांगला निधी खर्च करू दर्जेदार कामे करू, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितला..
अजित पवारांकडे पालकमंत्रीपद
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचे नाव आले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना चौफेर टीकेचा सामना करावा लागत आहे. विशेषतः बीडमधील सर्वपक्षीय आमदारांनी या प्रकरणी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यानंतर बीडचे पालकमंत्री पद हे पंकजा मुंडे यांच्याके जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवले आहे.
advertisement
नगरपालिका निवडणुकांसाठी पंकजा मुंडे तळ ठोकून
बीड नगरपालिका निवडणुक प्रचारासाठी घड्याळाच्या उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेनंतर आज बीडमध्ये भाजपच्या उमेदवारासाठी मंत्री पंकजा मुंडे यांची सभा होणार आहे.पंकजा मुंडे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आज दिवसभर बीडमध्ये तळ ठोकून आहेत गाठीभेटी , रॅली, बैठका आणि सभा घेत आहेत. भाजप उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटनही पंकजा मुंडे यांनी केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 6:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pankaja Munde Palakmantri: पंकजा मुंडे पुन्हा मनातलं बोलल्या, जाहीर सभेत व्यक्त केली इच्छा; म्हणाल्या बीडची पालक...


