Smriti Mandhana : 'आजच्या जगात...', पलाशने खरंच धोका दिला? ते स्क्रीनशॉट्स पाहून बहिणीने मौन सोडलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा रविवार 23 नोव्हेंबरला होणारा विवाहसोहळा पुढे ढकलला गेला, यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबई : स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा रविवार 23 नोव्हेंबरला होणारा विवाहसोहळा पुढे ढकलला गेला. स्मृतीच्या वडिलांना लग्नाच्या दिवशीच हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना सांगलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोन्ही बाजूंच्या कुटुंबाकडून स्मृतीच्या वडिलांची तब्येत बरी नसल्यामुळे लग्न पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलं, पण सोशल मीडियावर मात्र वेगवेगळे दावे केले जात आहेत. स्मृतीने लग्नासंदर्भातल्या सगळ्या पोस्ट सोशल मीडियावरून हटवल्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं.
सिंगर पलाश मुच्छल सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. स्मृती मानधना आणि पलाशचं लग्न पुढे ढकललं गेल्यापासून त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर आरोप केले जात आहेत. पलाशने स्मृतीला धोका दिल्याचा दावाही सोशल मीडियावर केला जात आहे. सोशल मीडियावर काही चॅट्सचे स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहेत, हे चॅट्स पलाशने मिस्ट्री गर्लसोबत केल्याचा दावा केला जात आहे, पण हे चॅट्स खरे आहेत का खोटे? याची पुष्टी अजून झालेली नाही. पलाशवर होत असलेल्या या आरोपानंतर त्याची बहिणी नीतीने प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
नीतीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने पलाशबद्दल गैरसमज पसरवू नका, असं आवाहन केलं आहे. 'पलाश हा कठीण परिस्थितीतून जात आहे. सत्य समजल्याशिवाय तुम्ही पलाशबद्दल मत व्यक्त करू नका. आजच्या जगात माणसापेक्षा टेक्नोलॉजी पुढे गेली आहे, त्यामुळे लोकांनी अफवांवरून पलाशबद्दल चुकीचं मत बनवू नये, त्याच्यासाठी प्रार्थना करा', असं नीती तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर म्हणाली आहे.
advertisement
या सगळ्या वादानंतर पलाश किंवा स्मृतीने आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पलाशच्या आईने मात्र स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 6:26 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : 'आजच्या जगात...', पलाशने खरंच धोका दिला? ते स्क्रीनशॉट्स पाहून बहिणीने मौन सोडलं!


