Best Bike : रोजच्या 10 किलोमीटरसाठी कोणती बाइक घ्यावी? 100cc की 125cc कोणती गाडी ठरेल फायद्याची डिल?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Best Bike for Short Distance : जेव्हा गाडी घ्यायला जातो तेव्हा मात्र कोणती गाडी घ्यायची यामध्ये लोक कन्फ्यूज होतात. काही लोक तर आपल्या मित्राने किंवा बाजूच्या बिल्डिंगमधल्या मित्राने घेतली म्हणून बाईक विकत घेतात. पण नंतर पश्चातापापाची वेळ येते.
मुंबई : आजकाल बाजारात बाइक्स इतक्या प्रकारच्या उपलब्ध आहेत की नवीन गाडी घ्यायची इच्छा तर होतेच, पण जेव्हा गाडी घ्यायला जातो तेव्हा मात्र कोणती गाडी घ्यायची यामध्ये लोक कन्फ्यूज होतात. काही लोक तर आपल्या मित्राने किंवा बाजूच्या बिल्डिंगमधल्या मित्राने घेतली म्हणून बाईक विकत घेतात. पण नंतर पश्चातापापाची वेळ येते. कारण प्रत्येकासाठी त्याचा वापर आणि चालवण्याची पद्धत वेगवेगळी असते.
कुणाचा मित्र 150 cc घेतो, कुणी 125cc, तर कुणी 100cc ला सर्वात चांगली मानतो. प्रत्येकजण आपल्या बाइकलाच “सर्वोत्कृष्ट” म्हणतो, त्यामुळे एक सामान्य खरेदीदार पूर्णपणे गोंधळात पडतो. काहींचा तर गाडीचा वापर जास्त नसतो किंवा ते फक्त 10 किलोमीटरच्या आसपासच गाडी चालवतात. मग अशावेळी कोणी गाडी घ्यावी? चला जाणून घेऊ
रोजचा छोटासा प्रवास, जो सहसा 5 किलोमीटर जाणे आणि 5 किलोमीटर परतणे इतकाच असतो, तो शहरी किंवा अर्ध-शहरी भागात ट्रॅफिकसह होतो. अशा छोट्या अंतरासाठी वेग किंवा जास्त पॉवरपेक्षा मायलेज, आराम आणि ट्रॅफिकमध्ये सोपी हँडलिंग जास्त महत्वाची ठरते. म्हणूनच, अशा गरजांसाठी लहान इंजिन क्षमता असलेली बाइक सर्वात व्यावहारिक आणि किफायतशीर ठरते.
advertisement
100 cc ते 125 cc छोट्या अंतरासाठी परफेक्ट
ज्यांचा रोजचा प्रवास फक्त 10 किलोमीटर असतो, त्यांच्यासाठी 100 cc ते 125 cc सेगमेंटची बाइक खरेदी करणं सर्वोत्तम ठरते. या बाइक्स उच्च मायलेजसाठी खास डिझाईन केल्या जातात. साधारणपणे, या बाइक्स 60-80 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देतात.
100cc किंवा 110cc बाइक्सचं वजन हलके आणि डिझाईन सोपी असल्यामुळे ट्रॅफिकमध्ये चालवायला आणि पार्क करायला सोपी असते. तर 125cc मध्ये थोडी अधिक पॉवर मिळते, जी शहरातील रस्त्यांवर सहज पुरेशी ठरते. मेंटेनन्सचा खर्च कमी असल्यामुळे, लांब कालावधीसाठी ही अत्यंत किफायतशीर ठरते.
advertisement
150cc ते 200cc थोड्या विशेष परिस्थितीसाठी
जर एखाद्या व्यक्तीचा रोजचा प्रवास फक्त 10 किलोमीटर असला तरी, तो महिन्यात एक-दोनदा हायवेवर 100-200 किमीची लांब राइड करतो, तर 150cc ते 200cc सेगमेंटची बाइक विचारात घेता येऊ शकते.
या बाइक्स 100 cc पेक्षा अधिक स्थिरता आणि आरामदायक सीट देतात, शिवाय याचा पिकअप जास्त असतो. पण मायलेज 40-50 किमी/लीटर पर्यंत कमी होते. याचा मेंटेनन्स खर्च थोडा वाढतो.
advertisement
फक्त 10 किलोमीटरसाठी हे थोडं ओव्हरकिल वाटू शकतं, पण जर राइडिंगमध्ये पॉवर आणि स्टाईल महत्त्वाचा असेल, तर हा पर्याय संतुलित ठरतो.
250cc आणि त्यापेक्षा जास्त बाइक्स
10 किलोमीटरसाठी 250cc किंवा मोठ्या इंजिनची बाइक घेणं समजूतदार निर्णय नाही. या बाइक्स हायवे आणि लांब प्रवासासाठी बनवल्या जातात. छोट्या अंतरावर याचं इंजिन नीट गरमही होत नाही, ज्यामुळे इंजिनवर अनावश्यक ताण येतो. पण हे लक्षात घ्या की त्याचं मायलेज खूप जास्त आहे. जे फक्त 30-40 किमी/लीटर असतं.
advertisement
खरेदी किंमत आणि मेंटेनन्स जास्त, त्यामुळे रोजच्या 10 किलोमीटरसाठी अत्यधिक खर्चिक ठरते.
जर तुमचा दररोजचा प्रवास फक्त 10 किलोमीटर असेल, तर 100cc ते 125cc सेगमेंटची बाइक ही सर्वात व्यावहारिक, किफायतशीर आणि सोयीस्कर ठरते.
कमीत कमी इंधन खर्च, ट्रॅफिकमध्ये सहज हँडलिंग होते, कमी मेंटेनन्स खर्च, तसेच शहरी प्रवासासाठी, प्रति किलोमीटरची बचत जास्त करणारी आणि आर्थिक दृष्ट्या सर्वोत्तम डील हीच पर्याय आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 6:21 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Best Bike : रोजच्या 10 किलोमीटरसाठी कोणती बाइक घ्यावी? 100cc की 125cc कोणती गाडी ठरेल फायद्याची डिल?


