व्यस्त जीवनशैलीमुळे रोज फेस वॉश आणि मॉइश्चरायझरशिवाय दुसरं काही लावणं अवघड होऊ शकतं. फेस मास्क वगैरेही रोज लावले जात नाहीत. अशा परिस्थितीत आठवड्यातून एकदा सकाळी किंवा संध्याकाळी घरातल्याच 3 गोष्टींचा वापर केला तर चेहरा सतेज दिसतो. यामुळे संपूर्ण आठवडा चेहऱ्यावर ग्लो राहील आणि त्वचेचं आरोग्यही चांगलं राहील. दूध, डाळीचं पीठ आणि काकडी या तीनच गोष्टी त्वचेच्या निगराणीसाठी आवश्यक आहेत.
advertisement
Curd : मध, हळद, दही खाण्याचे फायदे, त्वचेसह संपूर्ण प्रकृतीसाठी लाभदायक
चेहरा दुधानं स्वच्छ करा
सर्वप्रथम, चेहरा स्वच्छ करण्यासाठी दुधाचा वापर करा. कच्च्या दुधात क्लिंजिंग गुणधर्म असतात आणि यामुळे त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे त्वचेवर साचलेली घाण, धूळ आणि काजळीही निघते. एका भांड्यात दूध घ्या. त्यात कापूस बुडवून चेहऱ्याला लावा आणि चोळा. 4 ते 5 मिनिटं दुधानं त्वचा स्वच्छ केल्यानंतर पाण्यानं धुवा. त्वचेवर चमक येईल.
बेसनाचा फेस पॅक लावा
बेसनापासून सर्वात सोपा आणि प्रभावी फेस पॅक तयार केला जाऊ शकतो. बेसन फेस पॅकमुळे त्वचेवरचे डाग निघतात. चेहऱ्यावर चमक येते आणि त्वचा मुलायम होण्यासाठी हा पॅक फायदेशीर ठरतो. फेस पॅक बनवण्यासाठी 2 चमचे बेसनामध्ये 2 चिमूट हळद मिसळा आणि पेस्ट बनवण्यासाठी पुरेसं दही घाला. चांगलं मिसळल्यानंतर हा फेस पॅक 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा धुवून स्वच्छ करा. यामुळे त्वचा उजळ होते.
Dandruff : केसांतल्या कोंड्यावर नैसर्गिक उपाय, हे उपाय करुन पाहा, कोंडा होईल दूर
त्वचेला ताजेपणा देणारा टोनर
त्वचेवर ताजेपणा कायम ठेवण्यासाठी काकडीचा टोनर लावता येतो. साध्या पाण्यात किंवा गुलाब पाण्यात काकडीचा रस मिसळा, कापसावर लावा आणि चेहऱ्यावर पूर्णपणे पसरवा. टोनर लावल्यानंतर चेहरा धुण्याऐवजी ते रात्रभर ठेवू शकता किंवा 10 ते 15 मिनिटांनी चेहरा धुवू शकता. टोनर आठवड्यातून एकदाच नाही तर रोजही लावता येतो. चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.
आठवड्यातून एकदा या तीन गोष्टी चेहऱ्यावर लावल्यानं त्वचा चमकदार होण्यास मदत होते. या स्किन केअर रुटीनमुळे त्वचा फ्रेश राहते आणि त्यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याचीही गरज भासणार नाही.
