कन्नौज : उन्हाळ्यात, पावसाळ्यात आपण आतुरतेने हिवाळ्याची वाट पाहतो. गुलाबी थंडी जराही आवडत नाही, अशी एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. परंतु थंडीत त्वचा रखरखीत होणं, हात-पाय आखडणं हे अगदी सर्वसामान्य असलं तरी नकोसं वाटतं. तापमानाचा पारा घसरताच अनेकजणांच्या हाता-पायांना सूजही येते. परिणामी या दिवसांत रुग्णालयात जाणाऱ्यांची संख्या वाढते. परंतु शरिराच्या सूजेवर आपण घरगुती उपायही करू शकता. त्याबाबत डॉक्टर काय सांगतात पाहूया.
advertisement
उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर सैय्यद सलमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात जवळपास 150 रुग्ण त्वचेसंबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात आले होते. त्यापैकी अनेक रुग्णांच्या हाता-पायांची बोटं सुजली होती. त्यांना त्याठिकाणी दुखत असून खाजही येतेय.
वेळ नाही लागणार, फक्त 2 मिनिटं करा 3 योगासनं! स्लिम व्हाल मस्त, आजारही उडतील भुर्रर्र
थंडीत बोटं का सुजतात?
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, थंड वाऱ्यांमुळे शरिरातल्या नसा आखडतात. ज्याचा परिणाम रक्ताभिसरणावर होतो. हाता-पायाचा रक्तप्रवाहही मंदावतो. त्यामुळे बोटं लाल होऊ लागतात. परिणामी सूज येते. ही सूज एका ठराविक काळानंतर वाढते. त्यामुळे बोटं लाल-निळी होतात. परंतु थंडीत असं होणं सर्वसामान्य आहे. त्यामुळे घाबरायचं नाही. मात्र त्याकडे दुर्लक्षही करायचं नाही. आपल्या हाता-पायांची बोटं सुजल्यास त्यावर ताबडतोब वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
आवडीनं खाताय? आजच सोडा सवय; हेच इन्स्टंट नूडल्स तुम्हाला भरती करतील रुग्णालयात
सूज कमी कशी करावी?
डॉक्टरांनी सांगितलं की, थंडीमुळे बोटांना सूज किंवा खाज आल्यास हात-पाय काही वेळासाठी पांघरूणात ठेवावे. हळूहळू त्यांना उब मिळेल. बाहेरचं तापमान आणि शरिराचं तापमान सारखं झालं की, सूज कमी होऊ लागेल. मात्र लक्षात ठेवा, हाता-पायावर थेट गरम पाणी पडू देऊ नका. त्यामुळे सूज आणखी वाढू शकते.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g