‘एका हाताने टाळी वाजत नाही,’ हे जरी खरे असले तरी, कधीकधी नात्यात एका व्यक्तीचे वागणे असे होते की, दुसरी व्यक्ती कंटाळून नातं तोडण्याचा विचार करते. विशेषतः पत्नीच्या काही सवयींमुळे पतींना त्रास होऊ शकतो, ज्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. चला, पत्नीच्या कोणत्या सवयी पतीला आवडत नाहीत, ज्यामुळे नात्याचा बंध कमजोर होतो, याबद्दल जाणून घेऊया...
advertisement
1) पतीवर सतत संशय घेणे
पती-पत्नीच्या नात्याचा पाया विश्वास असतो. मात्र, जेव्हा पत्नी सतत पतीवर संशय घेते, तेव्हा नात्यात दुरावा निर्माण होतो आणि हा दुरावा दोघांना वेगळे करू शकतो. सोशल मीडियाच्या या युगात पत्नींना पतीबद्दल अधिक संशयी वाटू लागले आहे.
उदाहरणार्थ : कधीकधी पती घरी उशिरा पोहोचल्यास, पत्नी लगेच प्रश्न विचारणे सुरू करते. सतत संशय घेतल्याने पतीला राग येऊ शकतो आणि तो हळूहळू संवाद कमी करतो.
2) क्षुल्लक गोष्टींवरून नाहक चिडणे
‘जिथे प्रेम असते, तिथे वाद असणारच,’ हे स्वाभाविक आहे, मात्र कधीकधी पत्नी क्षुल्लक गोष्टींवरून नाहक पतीवर रागवते किंवा चिडते, ज्यामुळे घरातील वातावरण बिघडते. ही सवय पतीला त्रासदायक वाटते आणि तो हळूहळू संवाद कमी करतो. यामुळे नात्याचा बंध कमजोर होतो आणि भावनिक आधार तुटायला लागतो.
अशा परिस्थितीत, दोघांनी एकत्र बसून शांतपणे समस्या सोडवणे आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे. कारण, कोणतेही नाते तुटण्याचे कारण प्रेमाची कमतरता नसते, तर संवाद आणि विश्वासाचा अभाव असतो.
हे ही वाचा : खरं प्रेम नाही, हा तर भावनिक सापळा! तुमचे नाते 'ट्रॉमा बॉन्डिंग' तर नाही ना? ही 5 लक्षणे लगेच तपासा!
हे ही वाचा : प्रेम असूनही नातं तुटतंय? फाॅलो करा 'या' 4 खास रिलेशनशिप टिप्स; आयुष्यभर मिळेल पार्टनरची साथ!