रांची : अनेकजणांची सकाळ चहाशिवाय होतच नाही. त्यांच्यासाठी ब्रश केल्यानंतर चहा घेतला की, मग दिवस सुरू होतो. भारतात अशी क्वचितच काही घरं असतील, जिथे सकाळचा चहा बनवला जात नाही. नाहीतर जवळपास प्रत्येक घरात सकाळ आणि संध्याकाळचा चहा ठरलेलाच असतो. काहीजण तर दिवसभरात जेव्हा जेव्हा तल्लफ येईल तेव्हा तेव्हा चहा पितात. काहीजण कोरा चहा पितात, काहीजण दूधाचा पितात, तर काहीजण इतर फ्लेव्हरचा चहा पितात. पण तुम्ही कधी तांदळाच्या चहाबद्दल ऐकलंय का?
advertisement
आपल्या देशाच्या एका भागात लोक दिवसाची सुरुवात तांदळाच्या चहाने करतात. हा भाग म्हणजे झारखंडची राजधानी रांची. इथं तांदळाचा चहा लोकप्रिय आहे. शिवाय तो बनवण्याची पद्धतही वेगळी आहे. यात तांदूळ महत्त्वाचे असतात, त्यासह साखर, मीठ किंवा गूळ आपण आवडीनुसार घालू शकता. यामुळे पोटाचे विकार बरे होतात असं म्हटलं जातं.
Til Halwa Recipe : मकर संक्रांतीला तिळाचा हलवा खाणं असतं शुभ! आरोग्यासाठीही उत्तम, पाहा सोपी रेसिपी
'असा' बनवा तांदळाचा चहा
मिळालेल्या माहितीनुसार, सुरूवातीला भांड्यात थोडे लाल तांदूळ घ्यावे. पूर्ण काळे होत नाहीत तोपर्यंत ते भाजावे. मग 2 ते 3 कप पाणी घालून हे तांदूळ शिजवून घ्यावे. त्यात आलं, तेजपत्ता आणि गूळ घालावं. मिश्रण काहीवेळ शिजल्यानंतर चहा बनून तयार होईल. मग आपण या चहाचा आनंद घेऊ शकता.
Ghee Benefits : हिवाळ्यात तूप खा आणि आजारांना ठेवा दूर, या 5 प्रकारे करा उपाय!
तांदळाच्या चहाचे आहेत अनेक फायदे
लाल तांदळांमध्ये आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी12 असतं चांगल्या प्रमाणात. त्यामुळे हाडं होतात मजबूत. शिवाय वजन कमी होण्यासही मदत मिळते. मीठ घालूनही आपण हा चहा पिऊ शकता. तो मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतो. शिवाय जंतांपासून गॅसपर्यंत पोटाच्या सर्व विकारांवर या चहामुळे आराम मिळतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g