TRENDING:

Health Tips : छोट्या औषधी वनस्पती घेतील तुमच्या आरोग्याची काळजी, नैसर्गिक उपायांनी ठेवा तब्येत ठणठणीत

Last Updated:

धावपळ आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी जाणवतात. यासाठी, अनेकदा किरकोळ आजारांसाठी महागडी औषधं घेतली जातात. पण याऐवजी, भारतीय स्वयंपाकघरातल्या अनेक औषधी वनस्पती आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मदत करू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नोकरी असो किंवा घरचं काम, रोजच्या दिनक्रमात प्रकृतीच्या तक्रारींकडे लक्ष दिलं जात नाही. हे टाळण्यासाठी इथे दिलेल्या नैसर्गिक उपायांची यादी नक्की लक्षात ठेवा.
News18
News18
advertisement

धावपळ आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी जाणवतात. यासाठी, अनेकदा किरकोळ आजारांसाठी महागडी औषधं घेतली जातात. पण याऐवजी, भारतीय स्वयंपाकघरातल्या अनेक औषधी वनस्पती आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मदत करू शकतात.

तणाव - तज्ज्ञांच्या मते अश्वगंधा शरीरासाठी वरदान आहे. याला अ‍ॅडाप्टोजेन म्हटलं जातं, ज्याचा सोपा अर्थ असा आहे की ते तुमच्या शरीराला तणावाशी लढण्याची शक्ती देतं. अश्वगंधामुळे, तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते.

advertisement

Skin Care : मोहरीच्या स्क्रबनं चेहरा दिसेल फ्रेश, डाग होतील कमी, चेहरा येईल उजळून

झोपेच्या समस्या - ज्यांना निद्रानाशाचा त्रास होतो, त्यांच्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर मानले जातं.

स्नायू– व्यायामशाळेत जाणाऱ्यांसाठी अश्वगंधा खूप फायदेशीर मानली जाते कारण यामुळे स्नायूंची रिकव्हरी वेगानं होते.

तुळस - तुळस ही एक नैसर्गिक सूक्ष्मजीवविरोधी औषधी वनस्पती आहे, शरीरासाठी संरक्षक कवचाप्रमाणे  तुळस काम करते. बदलत्या ऋतूंमधे, सर्दी आणि खोकला टाळण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळशीचा वापर केला जाऊ शकतो. तुळस मानसिक आरोग्याच्या दृष्टीनंही महत्त्वाची वनस्पती आहे, यामुळेमन शांत होतं.

advertisement

Skin Care : उन्हाळ्यातही कायम राहिल त्वचेवरचं तेज, संत्र्यांच्या सालीच्या पावडरनं होईल टॅनिंग दूर आणि त्वचा स्वच्छ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मटणापासून ते बीफपर्यंत, 140 वर्षे जुनं पुण्यातलं हे मार्केट तुम्हाला माहितीये का? Video
सर्व पहा

शेवगा - डॉक्टरांच्या मते, शेवगा हा पोषक घटकांचा खजिना आहे, ज्यात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, अमिनो ॲसिड्स आणि भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. थकवा जाणवत असेल, तर शेवग्यामुळे तुमची ऊर्जा पातळी त्वरित वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शेवगा औषधाप्रमाणे काम करतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते. शेवग्यामुळे, शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. डॉक्टरांच्या मते, ॲनिमिया असलेल्यांसाठीही शेवगा खूप फायदेशीर आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : छोट्या औषधी वनस्पती घेतील तुमच्या आरोग्याची काळजी, नैसर्गिक उपायांनी ठेवा तब्येत ठणठणीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल