TRENDING:

Til Roll : तिळाच्या लाडवांव्यतिरिक्त काहीतरी बनवायचंय? पाहा तिळाच्या रोलची ही सोपी रेसिपी

Last Updated:

Winter Recipes In Marathi : तिळापासून बनवलेले पदार्थ खाण्याची उत्तम वेळ म्हणजे हिवाळा. वास्तविक तिळाचा स्वभाव उष्ण असतो, कडाक्याच्या थंडीत तिळापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरातील उष्णता व ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिवाळ्यात बनवल्या जाणार्‍या तिळ रोलचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. सध्या हवामानाचा मूड हळूहळू बदलू लागला असून तापमानात घट झाल्याने थंडीही वाढू लागली आहे. तिळापासून बनवलेले पदार्थ खाण्याची उत्तम वेळ म्हणजे हिवाळा. वास्तविक तिळाचा स्वभाव उष्ण असतो, कडाक्याच्या थंडीत तिळापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरातील उष्णता व ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. हिवाळ्यात तिळाचे लाडू, गजक यांसारखे पदार्थ सहज उपलब्ध होतात. तिळाचा रोलही आवडीचा पदार्थ आहे. सहसा आपण ते बाजारातून विकत घेतो आणि खातो. मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू करण्याऐवजी तुम्ही  यावेळी तिळाच्या रोलची रेसिपी करून पाहू शकता. वाचा ती बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरच्या घरी स्वादिष्ट आणि उर्जायुक्त तिळाचे रोल तयार करू शकता.
पौष्टिक आणि झटपट होणारे तिळाचे रोल
पौष्टिक आणि झटपट होणारे तिळाचे रोल
advertisement

तीळ रोल बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ड्राय फ्रुट्स - अर्धा कप

पांढरे तीळ - 3 कप

साखर - 3 कप

देशी तूप - 3 चमचे

गुलाबजल - 1 टेबलस्पून

कॉर्न सिरप - दीड कप

मीठ - 1 टीस्पून

पाणी - दीड कप

तिळाचा रोल बनवण्याची पद्धत

तिळाचा रोल बनवण्यासाठी प्रथम एक कढई घेऊन त्यात तीळ घालून भाजून घ्या. तिळाचा रंग हलका सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर तीळ एका प्लेटमध्ये काढा. आता कढईत साखर घाला आणि त्यात दीड कप पाणी घाला. यानंतर कॉर्न सिरप आणि मीठ एकत्र करून उकळा. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत उकळू द्या. यानंतर गुलाबजल आणि तूप घालून मिक्स करा. आता गॅस बंद करून थंड होऊ द्या.

advertisement

आता तुमच्या दोन्ही तळहातांना थोडे तूप लावा आणि तयार केलेले घट्ट मिश्रण हाताने चांगले मिसळा. यानंतर हे मिश्रण समान प्रमाणात वाटून घ्या. आता प्रत्येक भाग सुका मेवा आणि भाजलेल्या तीळांनी भरून घ्या आणि त्याचे रोल बनवा. रोलवरही तीळ लावा. अशा प्रकारे तुमचे चविष्ट तिळाचे रोल तयार आहेत. हे खायला अतिशय चविष्ट असण्यासोबतच शरीराला ऊर्जाही पुरवते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Til Roll : तिळाच्या लाडवांव्यतिरिक्त काहीतरी बनवायचंय? पाहा तिळाच्या रोलची ही सोपी रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल