अनेकदा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किंवा नवरा-बायको ऑफिसमधील वागणं खूप चुकीचं असतं. त्यांच्यामुळे इतरांना त्याचा त्रास होतो हे त्यांना कळतच नाही. पण त्याच्या वागण्यामुळे न कळत त्यांचे साथिदार किंवा कलिग यामुळे अफेक्ट होत असतात.
याच पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी एकाच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नवरा-बायको किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला काही रुल्स सांगितले आहे. ज्याचं पालन केल्याने तुम्ही दोन्ही गोष्टी बॅलेंस करु शकता.
advertisement
1. ऑफिसमध्ये नातं नव्हे, व्यावसायिकपणा ठेवा
तुमचं एकमेकांवर प्रेम असलं तरी ऑफिस हे कामाचं ठिकाण आहे, खासगी वेळ घालवायची जागा नाही. सहकर्मचाऱ्यांसारखं वागा. रोमँटिक इशारे, पर्सनल गप्पा या गोष्टी टाळा. यामुळे तुमची प्रोफेशनल इमेज टिकून राहील आणि ऑफिसमधील इतर कर्मचाऱ्यांनाही अस्वस्थ वाटणार नाही.
2. जबाबदाऱ्या स्पष्ट असू द्या
जर तुम्ही एकाच टीममध्ये किंवा प्रोजेक्टवर काम करत असाल, तर आधीच स्पष्ट करा – कोण काय करणार, जबाबदारी कुणाची? यामुळे अधिकारावरून वाद किंवा वर्चस्व गाजवण्याचे प्रसंग टळतील.
3. लंच ब्रेक म्हणजे स्वतंत्र वेळ
प्रत्येक वेळी एकत्र जेवण केलं पाहिजे, असं नाही. कधी इतर सहकाऱ्यांसोबत जेवा. यामुळे तुम्हाला वेगळ्या लोकांशी संवाद साधता येईल आणि ऑफिसमधील सामाजिक वावरही सुधारेल.
4. घरची भांडणं ऑफिसमध्ये आणि ऑफिसची कामं घरी नकोत
वर्क-लाईफ बॅलन्स म्हणजे दोन्ही आयुष्यांमधली सीमारेषा टिकवणं. ऑफिसमध्ये खासगी चर्चा किंवा घरातील ताणतणाव उगाळणं टाळा आणि घरात किंवा ऑफिसबाहेर सतत ऑफिसच्या गोष्टी बोलणंही टाळा.
5. गोपनीयता आणि प्रामाणिकपणा जपा
प्रोफेशनल गोष्टी जसं की खाजगी मीटिंग, क्लायंट मेल्स हे गरज नसताना पार्टनरसोबत शेअर करणं टाळा. ऑफिसमध्ये प्रामाणिकपणा आणि गोपनीयता राखणं दोघांच्याही करिअरसाठी महत्त्वाचं आहे.
नातं आणि काम एकत्र असलं, तरी ते कसं हाताळावं हे तुमच्यावर आहे. योग्य पद्धतीने वागल्यास तुम्ही नात्यालाही बळकटी देऊ शकता आणि करिअरमध्येही पुढे जाऊ शकता.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)