गुलाबपाणी, काकडी, ग्रीन टी, कोरफड, लिंबू पाणी यासारख्या नैसर्गिक टोनरमुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम दिसायला मदत होते. पाहूया या नैसर्गिक टोनरचा वापर कसा करायचा आणि त्याचा उपयोग कसा होतो.
गुलाबपाणी हे एक नैसर्गिक स्किन टोनर आहे, यामुळे चेहऱ्यावरची छिद्र कमी करण्यासाठी उपयोग होतो. गुलाबपाणी दररोज कापसानं चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेचं पीएच संतुलन राखलं जातं, तेल नियंत्रित केलं जातं आणि त्वचा आतून हायड्रेट होते. याचा नियमित वापर केल्यानं त्वचा मऊ राहते.
advertisement
Health Tips: हिवाळ्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा, या मसाल्यांमुळे नाक होईल मोकळं
काकडी - काकडीत 95% पाणी असतं, यामुळे त्वचा शांत होते आणि मॉइश्चरायझ होते. यामुळे छिद्र घट्ट राहतात आणि त्वचेवर चमक येते. काकडीचा रस काढा आणि तो स्प्रे बाटलीत भरून टोनर म्हणून वापरा. तेलकट आणि मुरुम येणाऱ्या त्वचेसाठी काकडी फायदेशीर आहे.
ग्रीन टी - ग्रीन टीमधे असलेले अँटीऑक्सिडंट्समुळे छिद्र कमी करण्यास मदत होते. थंड केलेला ग्रीन टी एका स्प्रे बाटलीत घाला आणि दिवसातून एक-दोन वेळा चेहऱ्यावर स्प्रे करा. यामुळे त्वचा घट्ट तर होईलच पण नैसर्गिक चमकही वाढेल.
कोरफड - कोरफडीच्या गरानं त्वचेवरची छिद्रं कमी होतात, त्वचेचा पोत सुधारतो. यासाठी, एक चमचा कोरफडीचा गर एक कप पाण्यात मिसळून टोनर बनवा. कोरड्या, तेलकट आणि संवेदनशील अशा सर्व प्रकारच्या त्वचेसाठी कोरफड उपयुक्त आहे.
Black Raisins: रोज किती काळ्या मनुका खाव्यात ? वाचा डॉक्टरांला मोलाचा सल्ला
लिंबू पाणी टोनर - लिंबूमधील व्हिटॅमिन सीमुळे त्वचा स्वच्छ राहते, त्वचेतून निघणारं तेल नियंत्रित राहतं आणि छिद्रं घट्ट करता येतात. एका भांड्यात दोन चमचे लिंबाचा रस आणि चार चमचे पाणी मिसळा आणि कापसानं चेहऱ्याला लावा. लिंबू पाणी फक्त रात्रीच वापरा आणि नंतर सनस्क्रीन लावायला विसरू नका.
- चेहरा धुतल्यानंतर लगेच टोनर लावा जेणेकरून छिद्रं आकुंचन पावतील.
- टोनर कधीही घासू नका; फक्त हलक्या हातानं लावा. नंतर मॉइश्चरायझर नक्की लावा.
- चांगल्या आणि दीर्घकाळ परिणामांसाठी आठवड्यातून चार-पाच वेळा टोनर वापरा.
- तेल, घाम, धूळ आणि अयोग्य स्किनकेअर रूटीनमुळे छिद्रं बंद होऊ शकतात.
