कोलेजन हे त्वचेमधे आढळणारं एक महत्त्वाचं प्रथिन आहे, यामुळे त्वचा लवचिक राहते. कोलेजन सप्लिमेंट्स उपलब्ध असतात तसंच घरीही कोलेजन पावडर बनवणं शक्य आहे.
घरी कोलेजन बनवण्यासाठी, गुलाबाच्या पाकळ्या, मेथीचे दाणे, ज्येष्ठमध, शेवग्याच्या पानांची पावडर आणि बडीशेप पावडरची आवश्यकता असेल. गुलाबाच्या पाकळ्या, मेथीचे दाणे, ज्येष्ठमध, मोरिंगा आणि बडीशेप पावडर एका कंटेनरमधे एकत्र करा. ही पावडर दिवसातून दोनदा घ्या.
advertisement
Dates: रोज खजूर खावेत का ? किती खजूर खाणं फायदेशीर ? वाचा सविस्तर
सकाळी एक चमचा कोमट दूध किंवा पाण्यासोबत घ्या. त्याचप्रमाणे रात्री एक चमचा घ्या. डॉक्टर मनोज दास यांनी याविषयीची माहिती दिली आहे. ही पावडर नियमितपणे घेणं खूप फायदेशीर आहे. याचे परिणाम लगेच दिसणार नाहीत. चार - सहा महिने नियमितपणे घेतले तर याचे परिणाम दिसतील. गुलाबाच्या पाकळ्या, ज्येष्ठमध, मोरिंगा आणि बडीशेप यात अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वं असतात.
यामुळे कोलेजनचं नुकसान रोखणं शक्य होतं तसंच त्वचेचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. मेथीच्या बिया ओमेगा-3 आणि प्रथिनांसारखे पोषक घटक यात असतात, ज्यामुळे त्वचेचं चांगलं पोषण होतं.
गुलाबाच्या पाकळ्या - गुलाबाच्या पाकळ्या त्वचेला उजळवण्यासाठी, मॉइश्चरायझिंग करण्यासाठी आणि डाग कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यामुळे मुरुमं आणि लालसरपणा कमी होतो आणि त्वचेवर चमक येते.
मेथीचे दाणे - मेथीचे दाणे त्वचेसाठी फायदेशीर आहेत. मुरुमं कमी करण्यासाठी, त्वचा उजळ करण्यासाठी आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यात असलेले पोषक तत्व आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला हायड्रेट करतात आणि घट्ट करण्यास मदत करतात.
Kidney Disease: किडनी विकारांचा धोका ओळखा, शरीरातल्या बदलांकडे लक्ष द्या
ज्येष्ठमध - ज्येष्ठमध पावडर त्वचेसाठी उत्कृष्ट आहे. ज्येष्ठमधात आढळणारा घटक ग्लाब्रिडिनमुळे मेलेनिनचं उत्पादन रोखलं जातं.
मोरिंगा पावडर - मोरिंगा पावडरचे अँटीमायक्रोबियल आणि अँटीफंगल गुणधर्म त्वचेला बरे करण्यासाठी आणि कोणताही संसर्ग किंवा किरकोळ जखमा यामुळे बऱ्या होतात.
बडीशेप - बडीशेपेमुळे, त्वचेवरचे मुरुम, डाग आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. यातले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांमुळे त्वचेला उजळते.
