Dates : आरोग्यासाठीचा पौष्टिक खाऊ, स्वादिष्ट आणि उपयुक्त खजूर, वाचा खजूर खाण्याचे फायदे

Last Updated:

खजूर म्हणजे स्वादिष्ट आणि आरोग्याला उपयुक्त सुका मेवा. फायबर, लोह, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स सारखे अनेक पोषक घटक यात भरपूर प्रमाणात असतात.

News18
News18
मुंबई : सुकामेवा म्हणजे आरोग्यासाठीचा पौष्टिक खाऊ. त्यातला खजूर म्हणजे स्वादिष्ट आणि आरोग्याला उपयुक्त सुका मेवा. फायबर, लोह, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स सारखे अनेक पोषक घटक यात भरपूर प्रमाणात असतात.
दररोज खजूर खाण्याचे फायदे पाहूया - चांगली आणि बऱ्याच काळासाठीची ऊर्जा मिळते. खजुरांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वेगानं वाढत नाही. ज्यांना दिवसभर सक्रिय राहण्याची गरज आहे त्यांच्यासाठी खजूर हा एक उत्तम पर्याय आहे.
आतड्यांसाठी फायदे - खजूर नैसर्गिक प्रीबायोटिक म्हणून काम करतात. यामुळे आपल्या आतड्यांमधे चांगले बॅक्टेरिया वाढतात. यामुळे पचन सुधारतं आणि पोटाच्या समस्या कमी होतात. ज्यांना वारंवार पोटफुगी किंवा गॅसचा त्रास होतो त्यांनी खजूर नक्कीच खावेत.
advertisement
बद्धकोष्ठतेपासून आराम - खजुरात फायबरचे प्रमाण जास्त असतं. फायबरमुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि आतडी स्वच्छ राहण्यास मदत होते. त्यामुळे, सकाळी दोन खजूर खाल्ल्यानं बद्धकोष्ठता किंवा कठीण मल कमी होण्यास मदत होते.
अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत - खजुरात अँटिऑक्सिडंट्स असतात. शरीरातील मुक्त रॅडिकल्स कमी  करण्यासाठी याची मदत होते. यामुळे यकृताचं आरोग्य सुधारतं आणि सूज कमी होते.
advertisement
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठीही खजूर मदत करतात. याचा अर्थ ते सौम्य डिटॉक्स फूड म्हणून काम करतात, शरीराला आतून स्वच्छ करण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी दोन खजूर खाणं सर्वोत्तम मानलं जातं. यामुळे दिवसभर ऊर्जा मिळते, पचन सुधारतं आणि शरीराला फायबर सहज शोषता येतं. आहारात कोणतेही बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dates : आरोग्यासाठीचा पौष्टिक खाऊ, स्वादिष्ट आणि उपयुक्त खजूर, वाचा खजूर खाण्याचे फायदे
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement