हे गॅजेट्स केवळ सोयीसाठी नसून, ते प्रवासातील तुमच्या गरजा पूर्ण करतात आणि नवनवीन गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी एक दुवा साधतात. चाला तर मग पाहूया प्रवासादरम्यान कोणते गॅजेट्स आपल्याकडे असायलाच हवे..
पॉवर बँक : प्रवासात फोनची बॅटरी संपणे हा प्रत्येक प्रवाशासाठी एक भयानक अनुभव असतो. अशावेळी पॉवर बँक तुमच्यासाठी आवश्यक असते. यामुळे तुमचा फोन, कॅमेरा आणि इतर उपकरणे चार्ज राहतील. यासाठी विश्वसनीय ब्रँड्सचे, फास्ट चार्जिंग आणि मोठ्या क्षमतेचे (किमान 10,000 mAh) मॉडेल्स निवडा. दुर्गम ठिकाणी प्रवास करताना सौर-ऊर्जेवर चालणारी पॉवर बँक खूप उपयुक्त ठरते.
advertisement
पोर्टेबल स्टोरेज : तुमच्या मेमरी कार्डची जागा पूर्ण झाल्यामुळे एखादा उत्तम फोटो क्लिक कारेक्रयाचा राहू शकतो. म्हनुनच तुमच्या सर्व फोटो आणि व्हिडिओजना सुरक्षित ठेवण्यासाठी पोर्टेबल स्टोरेज आवश्यक आहे. यासाठी कॉम्पॅक्ट फ्लॅश ड्राइव्ह खूप उपयुक्त आहे. यात USB-C आणि USB-A पोर्ट्स असल्याने तुम्ही तुमच्या फोन, टॅब्लेट आणि लॅपटॉपमध्ये फाइल्स पटकन ट्रान्सफर करू शकता.
गिम्बल किंवा अॅक्शन कॅमेरा : व्हिडिओ बनवणाऱ्यांसाठी आणि हौशी लोकांसाठी, गिम्बल किंवा अॅक्शन कॅमेरा तुमच्या प्रवासातील व्हिडिओंना एक नवीन रूप देतो. चांगल्या ब्रँड्सचा गिम्बल वापरल्याने व्हिडिओतील कंपणे कमी होऊन तुमचे फुटेज स्थिर आणि सिनेमासारखे दिसते. साहसी प्रवासांसाठी, एक कॉम्पॅक्ट अॅक्शन कॅमेरा कोणत्याही वातावरणात, पाण्याखालील दृश्यांपासून ते डोंगरवाटेतील व्हिडिओंपर्यंत, उच्च दर्जाचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी उत्तम आहे.
ई-रीडर : तुम्हाला पुस्तके वाचायला आवडत असल्यास, ई-रीडर तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. काही उपकरणांमध्ये तुमच्या आवडीच्या पुस्तकांचे एक मोठे कलेक्शन साठवता येते. पुस्तकांच्या वजनाची काळजी न करता, तुम्ही तुमच्या बॅगेत संपूर्ण लायब्ररी घेऊन जाऊ शकता, मग तुम्ही विमानात असा किंवा समुद्रकिनाऱ्यावर बसून.
टॅब्लेट : तुमच्या स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या मधे असणारा एक उत्तम पर्याय म्हणजे टॅब्लेट. हा फोटो आणि व्हिडिओ झटपट एडिट करण्यासाठी पुरेसा शक्तिशाली असतो आणि मोठ्या स्क्रीनमुळे चित्रपट पाहण्याचा अनुभवही चांगला मिळतो. चांगल्या ब्रँड्सचे शक्तिशाली टॅब्लेट प्रवासात मनोरंजनासाठी आणि कामासाठी उत्तम आहेत.
उत्कृष्ट कॅमेरा असलेला स्मार्टफोन : सर्वात शेवटी, सर्वात महत्त्वाचे गॅजेट म्हणजे तुमचा स्मार्टफोन. प्रवासासाठी उत्तम कॅमेरा असलेला फोन असणे आवश्यक आहे. हल्लीच्या बऱ्याच आधुनिक फोन्समध्ये उत्कृष्ट कॅमेरे असतात, जे सुंदर फोटो आणि हाय-रिझोल्यूशन व्हिडिओ काढू शकतात. या उपकरणांमुळे तुमच्या प्रवासातील प्रत्येक क्षण टिपणे आणि जगासोबत शेअर करणे सोपे जाते.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.