मुंबई : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेरळ परिसरात तुम्हाला सगुना बाग हे ठिकाण दिसेल. गेल्या अनेक वर्षांमध्ये कृषी पर्यटन या संकल्पनेला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. याच संकल्पनेशी निगडित कृषी पर्यटन या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून दाखवले जाते.
सगुना बागच्या चालकांपैकी एक म्हणजेच चंद्रशेखर भडसावळे. 'पूर्वीच्या काळात सापांना सिनेमाच्या माध्यमातून दैवी रूप लाभलं होतं. तेव्हा साप फार दुर्मिळ होते. मग माथेरान किंवा नेरळ परिसरातील पर्यटक या ठिकाणी साप बघण्यासाठी यायचे. मग तेव्हा शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन पर्यटकांना त्यांच्या शेतजमिनी, तलाव या सगळ्या गोष्टी पर्यटकांना दाखवण्यासाठी सुरुवात केली. आपल्या शेतात कोणताही पर्यटक येतो, ही एका शेतकऱ्यासाठी मोठी गोष्ट होती आणि याच नंतर कृषी पर्यटनाला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली' असं चंद्रशेखर भडसावळे सांगतात.
advertisement
Womens Day: हसू हरवलेले चेहरे अन् नशिबाच्या फासातील स्त्रिया, बुधवार पेठेतील महिलांची देवदूत
सगुना बाग येथे वेगळ्या प्रकारच्या शेती केल्या जातात. येथे खेकड्याची शेती देखील केली जाते. तसेच इथे पिकवलेल्या शेतातील खाद्यपदार्थ तुम्हाला तिकडच्या जेवणात आढळून येतात. सगुना बाग यांचे शेतात पिकवलेले वेगवेगळे उत्पन्न दुकानाच्या माध्यमातून मुंबईमध्ये विकले जाते. ठाणे, डोंबिवली, दादर अशा वेगवेगळ्या ठिकाणी यांचे दुकान आहे. तिथे ऑरगॅनिक फार्मिंग म्हणजेच नैसर्गिक शेतीतून निर्माण झालेले वेगवेगळे पदार्थ तुम्हाला विकत घेता येतात.
सगुना बाग या ठिकाणी जर तुम्ही सहलीला जाण्यासाठीच नियोजन करत असाल तर मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वे स्थानकापासून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. तुम्हाला शेअर ऑटो किंवा टॅक्सी देखील मिळून जाईल. या ठिकाणी जाण्याचे दर हे वेगवेगळे आहेत. स्टेशन पासून साधारण 30 ते 40 अंतरावर असलेल्या सगुना बागेत तुम्ही एका दिवसाची किंवा दोन दिवसाची देखील सहल करू शकता. एका दिवसाच्या सहलीचे दर हे 1700 रुपये आहेत.
जर तुम्हाला 24 तास थांबायचे असेल तर त्याचे दर 4 हजार रुपये इतके आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी जसे की फिशिंग, लाईव्ह शेती असे अनुभव तुम्हाला घ्यायला मिळतात. तसेच या ठिकाणी कुस्ती, मल्लखांब याची प्रात्यक्षिके दाखवली जातात. याशिवाय बोटिंग, झिप लाईन सारखे वेगवेगळे अनुभव देखील तुम्हाला या ठिकाणी घेता येतात.