TRENDING:

Golden Milk Benefits: गाढविणीचं महाग दूध परवडत नाही, मग प्या ‘हे’ गोल्डन मिल्क, राहाल एकदम फिट

Last Updated:

Golden Milk Benefits: हळदीचे दूध आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-डायबेटिक गुणधर्म आहेत जे विविध औषधांमध्ये असतात. म्हणूनच दुधात हळद टाकून ते दूध प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: हिवाळ्यात वातावरण बदलामुळे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अशा व्यक्तींना विविध त्रासांचा, आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे फक्त हिवाळ्यातच नाही तर दररोज दूध पिणं हे आरोग्यासाठी फायद्याचं मानलं गेलंय. दुधात असलेल्या पोषक तत्त्वांमुळे हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. गाय, म्हैस किंवा बकरीच्या दुधापेक्षा गाढविणीचं दूध हे अधिक पौष्टिक असतं. मात्र गाढविणीच्या दुधाची किंमत ही सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरची असते. त्यामुळे हिवाळ्यात फिट राहाण्यासाठी तुम्ही जर ‘गोल्डन मिल्क’ प्यायलात तर ते तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरेल.
प्रतिकात्मक फोटो : गाढविणीचं महाग दूध परवडत नाही, मग प्या ‘हे’ गोल्डन मिल्क
प्रतिकात्मक फोटो : गाढविणीचं महाग दूध परवडत नाही, मग प्या ‘हे’ गोल्डन मिल्क
advertisement

‘गोल्डन मिल्क’ नेमकं आहे तरी काय ?

नावावरून तुम्हाला असं वाटत असेल की, ज्या दुधात सोन्याचा अर्क असतो ते ‘गोल्डन मिल्क’ असेल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. ‘गोल्डन मिल्क’या दुधात जरी सोनं नसलं तरीही सोन्यासारखे फायदे हे दूध नक्कीच देऊ शकतं. मुख्य म्हणजे दुधाची किंमत तुम्हाला परवडणारी असेल. आयुर्वेदातलं सोनं असा हळदीचा उल्लेख केला जातो. कारण हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-डायबेटिक गुणधर्म आहेत जे विविध औषधांमध्ये असतात. म्हणूनच दुधात हळद टाकून ते दूध गरम करून प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील.

advertisement

जाणून घेऊयात हळदीच्या दुधाचे फायदे

हळदीचे दूध आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. सर्दी, खोकल्यासारख्या आजारांवर घरगुती उपाय म्हणून हळदीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. हळद उत्तम नैसर्गिक प्रतिजैविक (Natural Antibiotic) मानली जाते. हळदीचं दूध प्यायल्यामुळे त्वचेपासून ते पोटापर्यंत अनेक आजारांवर ते गुणकारी ठरतं. दुधामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स आणि विविध जीवनसत्त्वांसारखे पौष्टिक घटक असतात. दूध प्यायल्यामुळे शरीराला शक्ती मिळून तणाव दूर व्हायला मदत होते. याशिवाय दुधामुळे हाडं मजबूत होतात. दुधात हळद मिसळ्याने त्याचे फायदे अनेक पटींनी वाढतात.

advertisement

हृदय रोग: हळदीच्या दुधामुळे रक्तदाब नियंत्रणात राहून हृदयाचं आरोग्य सुधारतं. त्यामुळे हृदयविकार आणि हार्ट ॲटॅकची भीती कमी होते.

डायबिटीस: हळदीच्या औषधी गुणधर्मांमुळे रक्तातली साखर नियंत्रित राहायला मदत होते. त्यामुळे डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींसाठी हळदीचं दूध पिणं फायद्याचं आहे.

वेदनाशमक : हळदीत अँटी-इंफ्लेमेटरी म्हणजेच दाहकविरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे कोणत्याही दुखण्यावर किंवा गुडघेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी हळदीच्या दुधाचा फायदा होऊ शकतो.

advertisement

पचनास फायदेशीर: हळदीच्या दुधात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म पचनक्रिया सुधारतात. त्यामुळे आतड्यांवर कमी ताण येऊन आतड्यांचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Golden Milk Benefits: गाढविणीचं महाग दूध परवडत नाही, मग प्या ‘हे’ गोल्डन मिल्क, राहाल एकदम फिट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल