TRENDING:

Cancer : वय, स्मोकिंग की लाइफस्टाइल, नेमका कशामुळे वाढतो ब्लड कॅन्सरचा धोका? वाचून तुम्हीही व्हाल शॉक!

Last Updated:

आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे अनेक आजारांचा धोका वाढला आहे. कर्करोग हा देखील अशाच प्राणघातक आजारांपैकी एक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Blood Cancer Reasons : आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे अनेक आजारांचा धोका वाढला आहे. कर्करोग हा देखील अशाच प्राणघातक आजारांपैकी एक आहे. ब्लड कॅन्सर म्हणजे रक्ताचा कर्करोग, ज्याला वैद्यकीय भाषेत ल्यूकेमिया म्हणतात. या आजारात शरीरात असामान्य रक्तपेशी वाढू लागतात. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. ब्लड कॅन्सर होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, ज्यात वय, जीवनशैली आणि अनुवांशिकतेचा समावेश आहे.
News18
News18
advertisement

वय

ब्लड कॅन्सरचा धोका वाढत्या वयानुसार अधिक असतो. विशेषतः, 60 वर्षांवरील व्यक्तींमध्ये याची शक्यता जास्त असते. मात्र, काही प्रकारचे ब्लड कॅन्सर मुलांमध्येही आढळतात.

अनुवांशिक कारणे

काहीवेळा ब्लड कॅन्सर अनुवांशिक कारणांमुळे होऊ शकतो. जर तुमच्या कुटुंबातील कोणाला यापूर्वी ब्लड कॅन्सर झाला असेल, तर तुम्हालाही तो होण्याचा धोका वाढतो.

धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन

advertisement

धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे कर्करोग होऊ शकतात, त्यात ब्लड कॅन्सरचाही समावेश आहे. सिगारेटमधील विषारी रसायने रक्तपेशींच्या डीएनएमध्ये बदल घडवून आणतात.

रसायनांचा संपर्क

ज्या लोकांना कामाच्या ठिकाणी बेंझीन सारख्या हानिकारक रसायनांशी जास्त संपर्क येतो, त्यांना ब्लड कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो.

रेडिएशनचा संपर्क

जास्त प्रमाणात रेडिएशनच्या संपर्कात आल्यास ब्लड कॅन्सर होऊ शकतो. यासाठी वैद्यकीय उपचार, जसे की रेडिएशन थेरपी किंवा अणूऊर्जा प्रकल्पातील अपघात कारणीभूत ठरू शकतात.

advertisement

जीवनशैली आणि आहार

जरी जीवनशैलीचा थेट संबंध ब्लड कॅन्सरशी जोडलेला नसला, तरी चुकीच्या सवयी, जसे की कुपोषण, लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव, यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. या सर्व कारणांमुळे ब्लड कॅन्सरचा धोका वाढू शकतो. ब्लड कॅन्सरसाठी कोणतेही एक ठोस कारण नाही पण यासाठी जबाबदार अनेक कारण आहेत. त्यामुळे, कोणत्याही असामान्य लक्षणांवर लक्ष ठेवा. जर तुम्हाला सतत थकवा, वजन कमी होणे किंवा संसर्ग होत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर निदान झाल्यास उपचाराचे चांगले परिणाम दिसू शकतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cancer : वय, स्मोकिंग की लाइफस्टाइल, नेमका कशामुळे वाढतो ब्लड कॅन्सरचा धोका? वाचून तुम्हीही व्हाल शॉक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल