लवंगामध्ये युजेनॉल नावाचा सक्रिय घटक असतो, जो दाह-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतो. हे पाणी दररोज प्यायल्यास तुमच्या शरीरात काय सकारात्मक बदल होतात, ते जाणून घ्या.
advertisement
लवंगामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. दररोज लवंग पाणी प्यायल्यास तुम्हाला सर्दी, खोकला आणि सामान्य संक्रमणांपासून संरक्षण मिळते.
लवंग पाणी पोटातील एन्झाईम्सना उत्तेजित करते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. पोट फुगणे, गॅस आणि ऍसिडिटी यांसारख्या समस्यांवर हे पाणी खूप आराम देते. हे पाणी शरीरातील चयापचय क्रिया सुधारते. चयापचय दर वाढल्यामुळे फॅट्स लवकर बर्न होतात, ज्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात मदत होते.
लवंगामधील अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढतात. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि चेहऱ्यावरील डाग, मुरुम आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते.
लवंग हे नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे. लवंग पाणी प्यायल्याने तोंडातले बॅक्टेरिया कमी होतात आणि तोंडाला येणारा वास तसेच दातांच्या वेदनांवर आराम मिळतो.
काही संशोधनानुसार, लवंग शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहू शकते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे उपयुक्त ठरू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)