TRENDING:

Relationship Tips : तुमचा जोडीदार तर करत नाही ना Banksying? काय आहे हृदय तोडणारा नवीन रिलेशनशिप ट्रेंड

Last Updated:

बाहेरून हे शब्द फॅन्सी वाटू शकतात, पण वास्तवात हे नातं तोडण्याचा एक नवा, अत्यंत वेदनादायक मार्ग आहे. Banksying म्हणजे काय, हे कसं ओळखावं, आणि अशा नात्यांपासून स्वतःचं मन कसं वाचवावं. याबद्दल सविस्तर माहिती घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हल्ली रिलेशनशिपमध्ये ट्रेंडसची कमतरता नाही. कधी ghosting, कधी breadcrumbing, तर आता एक नवीन संज्ञा चर्चेत आली आहे. त्यात आता सोशल मीडियावर एक नवीन शब्द ट्रेंड होऊ लागला आहे, तो म्हणजे Banksying. सोशल मीडियावर या ट्रेंडची चांगलीच चर्चा रंगली आहे. बाहेरून हे शब्द फॅन्सी वाटू शकतात, पण वास्तवात हे नातं तोडण्याचा एक नवा, अत्यंत वेदनादायक मार्ग आहे. Banksying म्हणजे काय, हे कसं ओळखावं, आणि अशा नात्यांपासून स्वतःचं मन कसं वाचवावं. याबद्दल सविस्तर माहिती घेऊ.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

‘Banksying’ म्हणजे काय?

या ट्रेंडचं नाव प्रसिद्ध स्ट्रीट आर्टिस्ट Banksy यांच्यावरून घेतलं आहे. Banksy हे आपलं आर्ट कुठेही बनवतात आणि कोणालाही न भेटता अचानक गायब होतात. त्यांच्या ह्या वागण्याचीच एक झलक आता रिलेशनशिपमध्येही पाहायला मिळते. जिथे एखादा पार्टनर न सांगता, न भांडता नात्यातून हळूहळू इमोशनली दूर जाऊ लागतो. त्याला Banksying असं म्हणतात.

advertisement

हे ट्रेंड कसं दिसून येतं?

सुरुवातीला सगळं अगदी परीकथेप्रमाणे वाटतं. लक्ष, प्रेम, वेळ, संवाद. पण जसजसं नातं खोल होतं, एक पार्टनर जास्त गुंततो, तसंच दुसरा व्यक्ती अचानक इमोशनली मागे हटू लागतो. काही न सांगता तो संवाद कमी करतो, भेटणं टाळतो आणि कधी कधी तर पूर्णच गायब होतो. समोरच्या व्यक्तीसाठी हे प्रकरण गोंधळात टाकणारं आणि खूपच त्रासदायक ठरतं.

advertisement

'Banksying' चे परिणाम

अशा प्रकारची वागणूक नात्यांमध्ये confusion, self-doubt आणि emotional breakdown निर्माण करू शकते. ज्या व्यक्तीला नातं टिकवायचं असतं, ती समजूनही न घेता दुखावली जाते. "माझी चूक काय?" असा विचार तिचं मानसिक आरोग्य ढासळवतो आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या नात्याला कोणताही closure मिळत नाही.

अशा ट्रेंडपासून स्वतःला कसं वाचवावं?

advertisement

नातं सुरू करताना जरा संयम ठेवा, लगेच गुंतू नका. समोरच्याच्या वागण्यात अचानक बदल जाणवले, तर ते दुर्लक्ष करू नका. कोणत्याही नात्यात communication आणि self-respect फार महत्त्वाची असते. जर तुम्ही Banksying चा अनुभव घेत असाल, तर स्वतःला दोष देऊ नका. आपल्या विश्वासू मित्रांशी बोला, मानसिक मदतीसाठी काउंसलिंग घ्या.

शेवटचं महत्त्वाचं

नात्यात प्रेम असणं जितकं आवश्यक आहे, तितकंच त्यात स्पष्टता आणि इमानदारी असणं गरजेचं आहे. समोरच्याने काहीच न सांगता तुम्हाला सोडून दिलं, तर ती तुमची चूक नाही हे नेहमी लक्षात ठेवा.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Relationship Tips : तुमचा जोडीदार तर करत नाही ना Banksying? काय आहे हृदय तोडणारा नवीन रिलेशनशिप ट्रेंड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल