परंतु अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, या दोन्हींपैकी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर कोणती डाळ आहे? जर तुम्हाला ही हा गोंधळ असेल तर पुढील माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
प्रोटीनने समृद्ध मूगडाळ
मूगडाळ ही सहज पचणारी आणि प्रोटीनने भरपूर डाळ आहे. याशिवाय ती फॅट, फाइबर, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वांचा उत्तम स्रोत आहे. मूगडाळ खाल्ल्याने पचन सुधारते, पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर राहतात. तसेच हृदयाचे आरोग्य चांगले राहते, वजन नियंत्रित राहते, रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि ऊर्जा पातळीही वाढते.
advertisement
पोषकतत्त्वांचा खजिना मसूरडाळ
मसूरडाळीत प्रोटीनसह फाइबर, लोह, फोलेट, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. ही डाळ हाडे मजबूत करण्यास, वजन कमी करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासही ती उपयुक्त ठरते.