मुंबईतल्या मुलुंड मार्केटमधल्या वाइल्ड शॉप या ठिकाणी पुरुषांचे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेण्डी कपडे मिळतात. हे पुरुषांच्या कपड्याचं होलसेलमध्ये विक्री करणारं दुकान आहे. इथं सध्या ट्रेन्डमध्ये असलेले फॅन्सी शर्ट, चायनीज कॉलर शर्ट, चेक्स शर्ट असे अनेक प्रकारचे शर्ट फक्त 100 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.
Video : 2 रुपयांपासून करा राखीची खरेदी; काय आहे बाजारात ट्रेंड?
advertisement
फॅन्सी शर्टच नव्हे तर फॉर्मल ऑफिसमध्ये घालण्यासाठी लागणारे डिसेंट फॉर्मल कपडे देखील या ठिकाणी मिळतील. त्याचबरोबर पार्टीवेअर देखील या ठिकाणी स्वस्त दरात खरेदी करु शकता, अशी माहिती या दुकानाचे मालक इम्रान सरवैया यांनी दिली.
आम्ही बेंगलुरूमधून मोठ्या प्रमाणात कपडे आणतो. तिथं ते स्वस्त दरात मिळतात. त्यामुळेच आम्ही 100 रुपयात शर्ट ग्राहकांना देऊ शकतो. हा शर्ट खरेदी करण्यासाठी इथं मोठी गर्दी असते, अशी माहिती त्यांनी दिली.