मात्र या एका समस्येवर आपल्याला नियंत्रण ठेवता आले तर महिला दीर्घायुष्यासाठी तंदुरुस्त राहू शकतात आणि निरोगी दिसू शकतात. एवढेच नाही तर एकदा हार्मोन्स संतुलित झाल्यावर तुम्हाला मानसिकदृष्ट्या बरे वाटू लागेल. चला तर मग जाणून घेऊया महिलांनी हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी काय करावे. या विषयावर, क्लिनिकल आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ रिद्धिमा बत्रा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये महिला त्यांचे हार्मोन्स कसे संतुलित ठेवू शकतात हे सांगितले.
advertisement
महिलां अशा प्रकारे हार्मोन्स ठेऊ शकतात संतुलित
हाय प्रोटीन ब्रेकफास्ट : उच्च प्रथिने नाश्ता घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करा. यासाठी तुम्ही अंकुरलेल्या कडधान्याचे थालीपीठ, ऑम्लेट, दलिया, अंडी, दही इत्यादींचा नाश्त्यात समावेश करू शकता.
झोप महत्त्वाची : जर महिलांना त्यांचे हार्मोन्स संतुलित ठेवायचे असतील तर त्यांनी रात्री पूर्ण झोप घेतली पाहिजे. कमीत कमी 7 ते 9 तास झोप घेणे खूप फायदेशीर आहे.
स्ट्रेंथ ट्रेनिंग : जर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग केले तर ते तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यास आणि तुमचे हार्मोन्स चांगले ठेवण्यास मदत करू शकते. यासाठी तुम्ही चालणे, जॉगिंग, सायकलिंग, पोहणे इत्यादी करू शकता.
वनस्पती सर्वोत्तम अन्न : जर तुम्ही आठवड्यातून किमान 30 प्रकारचे वनस्पती आधारित अन्न समाविष्ट केले तर ते तुमचे आतडे निरोगी ठेवतील आणि तुम्हाला बरे वाटेल.
आपल्या वजनाची काळजी घ्या : शरीराचे वजन वाढू देऊ नका. जर वजन वाढत असेल तर त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यातील एक समस्या हार्मोन्सशी संबंधित आहे.
जर तुम्ही या काही सवयीचे पालन केले आणि तुमची जीवनशैली निरोगी बनवली तर तुम्ही दीर्घ आयुष्यासाठी या समस्या टाळू शकता. तसेच तंदुरुस्त, निरोगी आणि आनंदी राहू शकता.